Home विदर्भ दुचाकी अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात एक मुलगी ठार तर दोघे गंभीर जखमी

दुचाकी अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात एक मुलगी ठार तर दोघे गंभीर जखमी

573

ईकबाल शेख

नागपुर- अमरावती राष्ट्रिय महामार्गावरील भिष्णुर फाट्याजवळील घटना

 वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- नागपुर- अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर भिष्णुर फाट्याजवळ दुचाकी अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात एक मुलगी ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी साडे तिन ते चारच्या सुमारास हा अपघात झाला.

तळेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश उद्धव लसनकर वय (३५) व त्यांची आई श्रीमती बेबी उद्धव लसनकर वय (५५) व मुलगी रुपाली योगेश लसनकर वय (१३ ) सर्व राहणार खापरखेडा. ता. सावनेर जि. नागपुर हे बजाज पल्सर दुचाकी क्रं. MH. 40 AN 5781 ने खापरखेडा येथून अचलपुरला दशक्रीयेच्या कार्यक्रमाकरीता जात होते दरम्यान नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर भिष्णुर फाट्याजवळ दुचाकी अनियंत्रीत होवुन रोडपासुन साधारणत: २० फुट अंतरावरील झाडावर आदळुन यात कु.रुपाली योगेश लसनकर (वय १३) हिचा जागीच मृत्यू झाला. तर मंगेश उद्धव लसनकर व बेबी उद्धव लसनकर हे गंभीर जखमी झाले. रोडने येणार्‍या जाणार्‍यांनी १०८ या रुग्णवाहिकेला फोन केला असता रुग्णवाहिका हि एक तास उशीरा घटनास्थळावर पोहचली. सदर घटनेची नोंद तळेगांव पोलीसांनी घेतली असुन पुढील तपास ठानेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात पी.एस. आय. पवनराज भांबुरकर जमादार गजानन बावने पो. शि. रोषन करलुके व अमोल इंगोले करीत आहे.