
यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या गणेरी येथे नुकतेच व्हॉलीबॉलचे प्रेक्षणीय खुले सामने आयोजित करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अजय येल्टीवार ( उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी), पुरूषोत्तम गेडाम ( सरपंच गणेरी), विजयकुमार कुक्कलवार ( पोलिस पाटील सावंगी संगम), अशोक पाटील ( पोलीस पाटील गणेरी), नितिन नार्लावार ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती), मल्लिकांतरेड्डी एन्गूवार, महेन्द्ररेड्डी कंदेवार, सौ.ममता केशव आंबेपवार (सदस्या ग्रा.पं )श्री. रमेश वेट्टी (सदस्य, ग्रा. पं. )हनुमान वेट्टी ( माजी उपसरपंच), लक्ष्मण गेडाम, श्रीमती ललिताताई नारायण चिलावार( माजी सरपंच), सौ संगिताताई माणिक गेडाम ( माजी सरपंच),सौ रेखाताई पाटिल, नारायणराव धोटे, तानबाजी वेट्टी, सुभाष पशिवार, सुदाम अंबेपवार, गजानन चिलावार, रवींद्र पशिवार, रामलू चिल्कावार, माणिक गेडाम, रमेश कर्दपवार, गोविंदा गेडाम, तुळशीराम वेट्टी, राजारेड्डी वरगंटवार, केशव अंबेपवार, वामन गेडाम, भिमराव गेडाम, काशिनाथ कुडमथे, विठ्ठल चिल्लावार, गंगारेड्डी चिल्कावार, ठाणिकदास धोटे, राजारेड्डी परिवार, मनोहर गेडाम, पवन निबुदे, संदिप मोहाडे, जयश्री गेडाम, मस्के सर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झालेल्या उद्घाटनप्रसंगी भाष्कर वेट्टी यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेच्या आयोजनामागिल भूमिका,निरोगी आयुष्यासाठी खेळाचे महत्त्व, स्पर्धेकरीता गावकर्यांनी दिलेले योगदान, नवयुवक क्रीडा मंडळाची भूमिका,मोबाईल व टि व्ही च्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी खेळ एक माध्यम असल्याचे प्रास्ताविकातून नमुद केले.
दोन दिवसीय स्पर्धेत विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, प. महाराष्ट्रातील अनेक संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या सामन्यामधून एकता कल्ब पारवा ( प्रथम क्रमांक), मांडवी (द्वितीय क्रमांक), गोकुंदा किनवट (तृतीय क्रमांक), मल्लापुर तेलंगणा चतुर्थ क्रमांक पटकाविला. सहभागी सर्व संघानी नवयुवक क्रीडा मंडळाने व गावकर्यांनी केलेल्या आयोजनाची व व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त करतांना ” राज्य स्तरिय सामन्या सारखे” आयोजन, नियोजन व व्यवस्था असल्याचे गौरवोद्गार काढले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विनोद चिल्लावार, कलिराम वेट्टी, अभिलाष चिल्कावार, स्वप्नील अंबेपवार, नरेश गेडाम, पवन चिलावार, विशाल पाटिल, दत्ता कर्दपवार, मोहण कनाके, संदीप गेडाम, मनोज धोटे, नवनीत वेट्टी, संतोष धोटे, विजय पाटिल, माधव मेश्राम, प्रशांत पशिवार, अमोल पशिवार, दत्ता वेट्टी, मोहण बोरकर, पवन वरगंटवार, गणेश चिलावार, गजानन वेट्टी, गोपाल कुडमथे, हिरामण गेडाम, प्रनय अंबेपवार, जयपाल कुडमथे, साई अंबेपवार, सुरेश गेडाम, प्रताप गेडाम, आकाश कडदनवार, स्वामी गेडाम,रोहित गेडाम, गणेश गेडाम, सिद्धार्थ धोटे, राजू मोरे, जयपाल वेट्टी,निरंजन कोहचाडे, किशोर धोटे, गजानन कृष्णपेल्ल्लीवार, आनंद मोरे, धनराज कुळसंगे, कैलास धोटे, ईस्तारी वेट्टी, महेश कर्दपवार, महेश वाघाडे, ओम कृष्णपेल्ल्लीवार, बबलू काळे, बन्नी चिल्कावार, बाळू पाटिल अंकुश गेडाम लखन गेडाम ,यांनी परिश्रम घेतले.










































