Home विदर्भ माजी आ. स्व. निलेश देशमुख पारवेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य आरोग्य, रक्तदान...

माजी आ. स्व. निलेश देशमुख पारवेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य आरोग्य, रक्तदान शिबीर, रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

236

यवतमाळ – यवतमाळचे माजी आ. स्व. निलेश देशमुख पारवेकर यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त रामपूर कारेगाव येथे योगश देशमुख पारवेकर मित्र परिवाराच्या वतीने आज दि. 27 जानेवारी रोजी भव्य आरोग्य, रक्तदान शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाचे आयोजन आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री वसंतराव पुरके यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मंचावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, आशिष लोणकर, निमीष मानकर, बसेश्‍वर बिडवे, अभिषेक ठाकरे, सोनु उप्पलवार, श्रीकांत देशमुख पारवेकर, जयप्रकाश काटपेल्लीवार, प्रकाश चवरडोल, रुपेश कल्यमवार आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश देशमुख पारवेकर यांनी करुन सर्व मान्यवर अतिथींचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केले. प्रारंभी मंचावर सर्व मान्यवरांनी निलेश पारवेकर यांच्या प्रतिमेला पुष्प सुमन अर्पित करुन श्रद्धांजली दिली व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आरोग्य शिबीराकरिता योग्य सेवा देणारे यवतमाळ येथील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. सुबोध पुरोहित, नाक, कान, घसा तज्ञ डॉ. रोशन शहाकार, जनरल रोग तज्ञ डॉ. योगश देशेवार, ऍक्युप्रेशर तज्ञ डॉ. मधुकर सोनटक्के, डॉ. पल्लवी ढोणे, एकनिल ब्लड बँके तर्ङ्गे डॉ. रोहित मेश्राम, दंत रोग तज्ञ डॉ. धनश्री दिलीप मानकर, बालरोग तज्ञ डॉ. तुषार ढवळे तसेच दै. सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी विजय कुमार बुंदेला यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्य्षवसंत पुरके यांनी निलेश पारवेकरांच्या स्मृतीला उजाळा देतांना ते म्हणाले कि, विकासासाठी धावणारा खरा योद्धा म्हणून निलेश पारवेकरांनी काम केले याची जाण स्मस्त यवतमाळकरांना आहे. समाज सेवेचे व्रत जोपासून राजकारणात उत्तुंग भरारी मारणार्‍या पारवेकरांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित आरोग्य शिबीर हे प्रेरणादायी उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षपर भाषणातून माजी परिवहन मंत्री शिवाजीराव मोघे यांनी निलेश पारवेकरांबद्दल बोलतांना ते म्हणाले कि, यवतमाळ शहरातील शासकीय रुग्णालय व सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल हे निलेश पारवेकरांचे स्वप्न साकार झाल्याचे यवतमाळकर बघत असून विकास कामासाठी झटणारा राजकारणातील हिरा म्हणून पारवेकरांनी ख्याती प्राप्त केली आहे. या प्रसंगी अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. शिल्पा धावडे यांनी केले तर आरोग्य शिबीराच्या यशस्वीतेसाठी निलेश मेश्राम, अरुण अवताडे, प्रकाश हातगांवकर, राजेश टापरे, प्रेम राठोड, प्रदीप येन्नरवार, राजु धावणे, विजय डोहाळे यांनी केले. या प्रसंगी ग्रामवासी रुग्ण सेवेसाठी 24 तास रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आला. आरोग्य शिबीराचा शेकडो बांधवांनी लाभ घेतला.