Home नांदेड पीकविमा सरसकट व तात्काळ मंजूर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू “प्रहार जणशक्तीचे...

पीकविमा सरसकट व तात्काळ मंजूर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू “प्रहार जणशक्तीचे कैलास येसगे यांनी दिला शासनाला इशारा

194

 राजेश एन भांगे

देगलूर – प्रहार जनशक्ती पक्षाने दिला मुख्यमंत्री यांना धमकीवजा निवेदन

सप्टेंबर-आक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पंचनाम्यातूनही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. तरी परंतु ७२ तासाच्या आत पीकविमा कंपनीकडे क्लेम दाखल केलेल्या मोजक्या शेतकऱ्यांना पीकविमा देऊन कंपनीने ९०% शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पीकविमा मंजूर व्हावे म्हणून यापुर्वी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलनही केले. १५ हजार तक्रार अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कडे दाखल केले. तरी परंतु यावर प्रशासनाने कुठलीच कार्यवाही केली नाही. म्हणून अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना या मागणीचे निवेदन दिले.
उंबरठा उत्पन्न, पीक कापणी प्रयोग वा इतर जाचक अटी रद्द करून सरसकट व तात्काळ पीकविमा मंजूर करण्यासाठी शासन व प्रशासनाने पुढाकार घेऊन पीकविम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करावी अन्यथा संपूर्ण नांदेड जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा धमकीवजा इशारा देण्यात आला.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कैलास येसगे, गंगाधर आऊलवार, दिपक रेड्डी मरतोळीकर, विद्यासागर जुक्कलवार, वैभव पाटील मरतोळीकर, यादवराव बोरगावकर, जावेद अहमद, संग्राम पाटील, मारोती पाशमवार, गुरूलिंग सुलफुले, बालाजी दासरवाड, गंगाधर रेड्डी कलमुके व अनेक शेतकरी उपस्थित होते.