Home मराठवाडा जालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जालना जिल्ह्यात हिंदू हृदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

41
0

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख, मराठीजनांचे मानबिंदू स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ( ता. २३) शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुनराव खोतकर यांच्या भाग्यनगर येथील संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले. 

प्रारंभी उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, तालुकाप्रमुख संतोष मोहिते , माजी सभापती पांडुरंग डोंगरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. या वेळी गोपीकिशन गोगडे, किशोर पांगारकर,नरेश खुदभैय्ये, अजय कदम, अॅड. भगवान गिराम, सुभाष क्षीरसागर,मनोज थोरात,दिनेश फलके, रमेश चांदर, कार्यालयीन कर्मचारी मनिष तनपुरे,ज्ञानेश्वर क्षीरसागर , प्रविण गव्हाणे, लक्ष्मण गाडेकर यांच्या सह आदींची उपस्थिती होती. अंबड शहरात शहर शिवसेना शाखेच्या वतीने माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी अभिवादन केले, घनसावंगी येथे शिवसेना नेते हिकमत उढाण यांच्यासह शिवसैनिक, पत्रकार व इतरांनी अभिवादन केले. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,,, अमर रहे,,, अमर रहे…. शिवसेना जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

Unlimited Reseller Hosting