Home विदर्भ आंदोलन सम्राट बाळाभाऊ जगताप दिल्लीत दाखल

आंदोलन सम्राट बाळाभाऊ जगताप दिल्लीत दाखल

276

ईकबाल शेख

वर्धा :- गेल्या काही महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे केंद्र सरकारने केलेल्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष तथा वर्धा जिल्हा मधील शेतकऱ्यांचे नेते आंदोलनसम्राट बाळा भाऊ जगताप यांनी स्वतः घोषित केल्याप्रमाणे आज दिल्ली येथे गाझियाबाद बॉर्डर वर डेरेदाखल दाखल. देशभरातील शेतकऱ्यांचा या आंदोलनाला वाढता पाठिंबा लक्षात घेता आपला जिल्हा व आपला विधानसभा मतदार संघामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून बाळा भाऊ जगताप हे आपल्या सहकाऱ्यांसह दिल्ली येथे दाखल झाले. आंदोलन स्थळी उपस्थित शेतकरी व शेतकरी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी बाळा भाऊ जगताप यांना २६ जानेवारी च्या परेड चे खास निमंत्रण दिले हे आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी व जिल्हासाठी अभिमानास्पद बाब आहे….
सरकारने लवकरात लवकर सदर आंदोलनातील मागण्या मान्य करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढून हे काळे कायदे शेतकरी हिताकरिता मागे घ्यावे अन्यथा शेतकऱ्यांमध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही… अशी भावना बाळा भाऊ जगताप यांनी व्यक्त केली…