Home जळगाव दिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी...

दिल्ली बॉर्डर वर सुरू असलेल्या अभूतपूर्व शेतकरी आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालेले लोकसंघर्ष मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक परेड रॅलीत ही आदिवासी संस्कृतीची झलक दाखवत होणार सहभागी

73
0

रावेर (शरीफ शेख) 

महाराष्ट्रातून जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद जिल्ह्यातून 600 महिला व 450 पुरुष कार्यकर्त्यांसह लोकसंघर्ष मोर्चा चे किसान आंदोलक दि 17 जानेवारीपासून धडकले असून त्यांनी जयपूर दिल्ली महामार्गावर शहाजहांपुर बॉर्डर वर राजस्थान व हरियाणातील शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या” घेरा डालो डेरा डालो ” आंदोलनात सहभागी झाले आहेत.

येथे राजस्थान व हरियाणा तसेच केरळ चे किसान साथी डेरा टाकून बसले आहेत त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या या जथ्याचे स्वागत केले लोकसंघर्ष मोर्चाच्या साथींनी गाणी , घोषणा व भाषणे करत आंदोलन स्थळ गाजवले यात प्रतिभाताईं सह झिलाबाई वसावे,अजबसिंग वसावे,ताराचंद बारेला, बाबूसिंग नाईक , रमेश नाईक, बानू बाई वसावे, रुमकीबाई पावरा आदींनी आपल्या भिली ,पावरा व मराठी भाषेत जोरदार भाषणे करून सर्वांची मने जिंकलीत तसेच आपल्या आदिवासी संस्कृतीची वेषभूषा ढोल, तिरकमान, शिबल्या, घुंगरू, पावे, आणि लक्षवेधी पदन्यास टाकत नृत्याचे सामूहिक दर्शन याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे .
यात बिरसामुंडा, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डाँ आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आदींच्या फलकांनी ही विषेश आकर्षण निर्माण झाले आहे
दिल्लीतील सिंघु बॉर्डरवर सुरू असलेल्या मुख्य आंदोलनस्थळी तसेच गाझिपुर व टिकरी बॉर्डरवर ही जाऊन तेथे सातपुड्यातील आदिवासी महिलांनी निदर्शन करीत या आंदोलनातील आपला सहभाग दर्शवला व समर्थन व्यक्त केले .
मोदी सरकारने तिन्ही कायदे रद्द करावेत तसेच शेती व जंगले जर कार्पोरेट कंपन्यांच्या घश्यात घातलीत तर आम्ही उलगुलांनचा नारा देत तीव्र आंदोलन करू असा इशारा ही प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे
दरम्यान शेतकरी प्रतिनिधी व सरकार यांच्यातील 11 व्या फेरीतील चर्चा ही निष्फळ ठरल्याने दिल्लीत 26 जानेवारी रोजी खऱ्या अर्थाने गणतंत्र दिवस परेड आम्ही दाखवू असा इशारा देत किसन ट्रॅक्टर परेड रॅली काढण्यावर ठाम असलेल्या किसान आंदोलनापुढे शासनाला झुकावे लागले असून या रॅली ला परवानगी द्यावी लागली आहे या अभूतपूर्व अश्या प्रजासत्ताक किसान परेड मध्ये आपल्या आदिवासी संस्कृतीची झलक दाखवत या रॅलीत लोकसंघर्ष मोर्चाचे सर्व कार्यकर्ते आपला ऐतिहासिक सहभाग नोंदवणार आहेत असे प्रतिभाताई शिंदे यांनी माहिती दिली.

Unlimited Reseller Hosting