Home विदर्भ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य यवतमाळात मोफत अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी आणि बायपास...

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य यवतमाळात मोफत अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया शिबिर

313

मोफत हृदयरोग शिबीराचा लाभ घ्यावा- पालकमंत्री संजयभाऊ राठोड

 यवतमाळ :- शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.) तसेच श्री वसंतराव नाईक शा. वै. म. तथा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात भव्य मोफत –हदयरोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात गरजु रुग्णांची मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात येणार असल्याने गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांनी केले आहे.

दि.२४ आणि २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नविन मुलींचे वस्तीगृह, श्री वसंतराव नाईक शा.वै.महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.गजेंद्र अग्रवाल, डॉ.सतिश खडसे, डॉ.चेतन राठी,डॉ संदीप चौरसिया (कार्डीओलॉजिस्ट) रुग्णांची तपासणी करतील. छातीमध्ये वेदना, श्वास घेतांना त्रास होणे, छातीत भरल्या सारखे वाटणे, चालतांना धाप लागणे, पायावर सुज येणे, उच्च रक्तदाब व मधुमेह आजार असल्यास रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात येणार आहे. शिबीर स्थळी हृदयरोग तपासणी, ब्लड शुगर, ई.सी.जी. व तज्ञांच्या सल्ल्यानुसार २ डी ईको व टि.एम.टी. तपासणी मोफत करण्यात येईल.तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याकरिता तारीख दिली जाईल.रुग्णांवरील सर्व शस्त्रक्रिया ह्या मोफत करण्यात येणार असून शिबिरात तपासणी झाल्यावर दिलेल्या तारखेला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी ( मेघे ) वर्धा येथे करण्यात येईल ह्याची सर्व रुग्णांनी नोंद घ्यावी.वरील माहिती गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना व मित्र मंडळींना देवून या सामाजिक उपक्रमास यशस्वी करण्यास मदत करण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, विश्वास नांदेकर, अभ्यागत मंडळ सदस्य डॉ. महेश चव्हाण, सौ. सागरताई पुरी, विकास क्षीरसागर यांनी केले आहे. या शिबीरात फक्त पुर्व नोंदणी केलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. दिनांक 23 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यन्त नोंदणी होणार असल्याने गरजु रुग्णांनी प्रत्तेक तालुक्यातील संबंधित शिवसेनेच्या पदाधिका-यांसोबत संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदान वाहिनीचे लोकर्पण

शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्हयाला प्रथमच रक्त संकलन (रक्तदान) वाहिनी मिळाली आहे. दिनांक 24 जानेवारी रोजी या वाहिनीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते होणार आहे. संपुर्ण जिल्हयात फिरुन तसेच रक्तदान शिबीर आयोजित करुन ही वाहिनी रक्त संकलन करणार आहे. या वाहिनीत रक्त संकलन, साठवण तसेच इतर सर्व सुविधा आहे. वैदयकीय महाविद्यालयात रुग्णांना सतत रक्ताचा पुरवठा कमी पडत असतो. आता ही अडचण दुर करण्यासाठी ही वाहिनी महत्वाची ठरणार आहे.