Home मुंबई फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा , “आरपीआय डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा”

फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा , “आरपीआय डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा”

226

मुंबई ,  दि. 19  (प्रतिनिधी) :-  गोरेगाव फिल्मसिटी 1 व 2 क्रमांकाच्या स्टुडिओ मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून आर.पी.आय डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचीव डॉ. राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड पाठपुरावा करट आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहिती नुसार फिल्मसिटी व्यवस्थापनाकडून फार मोठी चोरी केली असल्याचे निदर्शनात आले आहे.

डॉ. माकणीकर व कॅ. गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार कलागार म्हणजेच स्टुडिओ क्रमांक १आणि २ इमारतीचे स्ट्रक्चर चे ऑडिट डी डी कुलकर्णी आणि सरदार पटेल महाविद्यालयाने या दोन्ही स्टुडिओच्या इमारती धोक्याच्या असून या पाडुन नव्याने बांधण्यात याव्यात मात्र तसे न होता मंडळाद्वारे डागडुगी व दुरुस्ती करून नीला प्रोडक्शनला चाविण्याची परवानगी दिली आहे.

सदर स्टुडिओ मध्ये AC प्लांट चालविण्यासाठी जागा असूनही दुसरीकडे देण्यात आली अस करण्यामागच कारण काय? शिवाय सदर इमारती या मोडकळीस आल्याचा रिपोर्ट असूनही बृहन्मुंबई महापालिके च्या अधिकार्यांनी परवानगी दिली कशी?

शिवाय महामंडळाला स्वतःला फायदा होत असताना नीला प्रोडक्शन ला जागा दिली असतांना निला प्रोडक्शनने ती थर्ड पार्टीला किरायाने कशी काय दिली??

महामंडळाने नीला स्टुडिओला सुरुवातीचे ६ महिने भाडे ही माफ केले, ७ व्या महिन्यानंतर भाडे घेण्याचे काय कारण असावे. यात भरपूर काही काळे बेरे असून हा प्रकार उघडकीस आणून महामंडळाचे संबंधित अधिकारी व बृहन्मुंबई अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून निलंबित करण्याची मागणी डॉ. माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड यांनी केली आहे.

याबद्दल श्री संदीप कापुरे यांच्या बातचीत केली असता त्यांनी कोणतीही जवाबदारी न स्वीकारता त्यांचे वरिष्ठ अधिकारी श्री. चंद्रकांत कोळेकर यांना विचारणा करण्यास सांगितले. तर वरिष्ठ अधिकारी कोळेकर यांच्याशी बोलले असता त्यांनी हा निर्णय सांस्कृतिक मंत्री व मंडळाचे एम. डी. चा निर्णय असल्याचे सांगितले.

सर्व प्रकरणाची सारवा सारव करत असून लवकरच आंदोलन करण्यात येईल व न्यायालयाची दारे ठोठावण्यात येतील अशा इशारा डॉ. माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिला.