Home जळगाव सालार नगर अपघात प्रकरणी सिन्हा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल

सालार नगर अपघात प्रकरणी सिन्हा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल

367

महामार्गवर एक तास ठिय्या आंदोलन

रावेर (शरीफ शेख)

जळगाव शहरातून जात असलेल्या व कार्यरत असलेल्या चौपदरी मार्गाच्या अजिंठा चौक लगत सालार नगर येथे तयबा मोटर गॅरेज समोर ट्रक क्रमांक डी एम 09- M 9359 ने मोटरसायकल क्रमांक एम एच बारा 92 26 ला जोरदार धडक देऊन अपघात केला असता त्यात समाधान श्रीराम चंदन व धवल अंबादास भोसले दोघी राहणार येवला जिल्हा नाशिक हे गंभीर जखमी झाले असून समाधान चंदन हे स्पॉटला मृत्युमुखी पडले तर धवल भोसले हे जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर परिस्थितीत उपचार घेत आहे.

सदर अपघाताचे वृत्त घडतात हायवेवर समूह पद्धतीने आंदोलन करण्यात आले त्यात एम आय एम चे नगरसेवक रियाज बागवान, जिल्हाध्यक्ष जिया बागवान, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, साहिल पटेल,डॉ रिझवान, अडव्होकेट इमरान शेख व इतर तरुणांनी पोलीस व महामार्ग पथका समोर महामार्ग अडवून अंडर पास त्वरित तयार करा अशा आपल्या भावना व्यक्त केल्या व सुमारे एक तास हायवेवर आंदोलन करण्यात आले. सहा पोलीस अधीक्षक चिंता व पो नि शिंत्रे यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने महामार्ग सुरू करण्यात आले.

*फारुक शेख यांनी दाखल केलेली तक्रार*
अपघात घडला त्यावेळेस फारुक शेख हे आपल्या कुटुंबीयांसोबत जामनेर येथील लग्नात होते त्यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर अपघाताचे वृत्त कळताच ते तातडीने जळगावी दाखल झाले व सरळ एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जाऊन लेखी एफ आय आर दाखल केली व त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की या अपघातात जे आमचे बंधू समाधान श्रीराम चंदन हे मृत्युमुखी पडले व दुसरे धवल अंबादास भोसले हे गंभीर जखमी आहे त्यांच्या वतीने तक्रार दाखल केली की या अपघातात ट्रक चालक हे जरी जबाबदार असले तरी त्यात सर्वस्वी राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा व ठेकेदार कंपनी झेंडू कन्स्ट्रक्शन हीसुद्धा जबाबदार असून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार पोलीस निरीक्षक प्रताप सिंग चित्रे यांच्या कडे सादर केली.

*१२ जानेवारी रोजी सीआरपीसी ३९ नुसार वर्दी दिली होती- फारुक शेख*

सी आर पी सी 39 प्रमाणे दिनांक 12 जानेवारी रोजी अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक याठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून त्यात जीवित हानी सुद्धा होईल व ही जीवित हानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग चे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना एका वर्षापासून वेळोवेळी नगरसेवक रियाज बागवान व स्वतः फारुक शेख यांनी सुमारे आठ ते दहा निवेदने दिलेली आहे परंतु त्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने याठिकाणी जीवित हानी झाल्यास त्यास सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व झंडू कॉन्स्ट्रुकशन कंपनी जबाबदार राहील अशी लेखी तक्रार माननीय जिल्हा दंडाधिकारी जळगाव व पोलिस अधिक्षक यांना 12 जानेवारी रोजी सादर केली होती 13 जानेवारी रोजी प्रत्यक्ष एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक प्रताप सिंग शीत्रे यांना भेटून सदर एफआयआर दाखल करण्याची विनंती केली होती व त्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा यांना सुद्धा सदर तक्रारीची प्रत देण्यात आली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून आज घडलेल्या जीवित हानीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार झेंडू कन्स्ट्रक्शन कंपनी सुद्धा जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केलेली आहे.

*तक्रार दाखल करतांना यांची होती उपस्थिती*

फारुक शेख यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण माहिती दिली असता त्यांनी आपली तक्रार आपण लेखी स्वरूपात द्या म्हणून फारुक शेख यांनी नगरसेवक रियाज बागवान राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, साहिल पटेल ,परिसरातील ॲडव्होकेट इमरान शेख,अनिस शाह, सईद शेख यांच्याशी चर्चा करून तक्रार दाखल केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्राचे प्रमुख गफ्फार मलिक यांनीसुद्धा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन तक्रार च्या मागणी ला पाठिंबा दिला.