Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काटपेल्लीवार, यमसनवार , येरावार गटाचे उमेदवार...

घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काटपेल्लीवार, यमसनवार , येरावार गटाचे उमेदवार भरघोष मतांनी विजयी

346
0

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ :- घाटंजी तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी कुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, भाजपाचे घाटंजी तालुका व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रमेश यमसनवार, डाँ. गोविंद येरावार व भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक यमसनवार यांच्या माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांच्या गटाचे ९ पैकी ९ उमेदवार भरघोष मतांनी विजयी झाले आहे. 

दरम्यान, या निवडणुकीत मल्लेसु बोदुलवार, भाउ कुमरे यांच्या आमदार डाँ. संदीप धुर्वे व माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गट आणि माजी सरपंच नरसिंगराव मुत्यालवार, माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी गट पुर्णत: पराभुत झाला आहे.
कुर्ली ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत खालील प्रमाणे उमेदवार विजयी झाले आहेत.
*वार्ड क्रमांक १* – मेश्राम लक्ष्मण नामदेव (२३३ मते), भालशंकर साधना चंद्रशेखर (२३० मते), अंगावार सरीता रमेश ((२६६ मते)
*वार्ड क्रमांक २* – जाधव फुलचंद हिरामण (२६१ मते), आत्राम संजय तुकाराम (२४२ मते), किणाके मीराबाई हनमंतु (२८१ मते)
*वार्ड क्रमांक ३* – गड्डमवार सतिष लचमारेड्डी (२४१ मते), आत्राम जोत्स्ना आकाश (२३३ मते) व बंडीवार ललीता देवन्ना (२२१ मते) हे नउही उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान, सद्यातरी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने विजयी उमेदवार संम्रभात असून सरपंच पदासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहे. सरपंच पदाच्या शर्यतीत सद्यातरी सतिष लचमारेड्डी गड्डमवार, मीराबाई हनमंतु किणाके, संजय तुकाराम आत्राम आपली व्युव्हरचना आखतांना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार पुजा माटोडे, निवडणूक नायब तहसीलदार एल. डी. मेंढे, ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी विजय मेश्राम (कुर्ली), निवडणूक लीपीक श्री. मानवटकर आदींनी काम पाहीले. विशेष म्हणजे शिरोली ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत लोणकर, महल्ले गट पराभुत झाला आहे. तथापि, घाटंजी तालुक्यातील सावंगी (संगम) येथील एकमेव ग्रामपंचायत घाटंजी तालुक्यातुन अविरोध निवडून आली आहे.
घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्यासह पोलीस उप निरीक्षक, जमादार, पोलीस शिपाई आदींनी ग्रामपंचायतीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवला होता, हे विशेष.