Home पश्चिम महाराष्ट्र ती 18 वर्षाची झाली त्या आनंदात ती हाँटेलात गेली ? अन विपरितच...

ती 18 वर्षाची झाली त्या आनंदात ती हाँटेलात गेली ? अन विपरितच घडला ???

349
0

 

आरोपी वेटर ला अटक ,

अमीन शाह ,

पुण्यात कुटुंबियासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणीचे स्वच्छतागृहात एका वेटरने मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी पाषाणमधल्या सुतारवाडी परिसरात असलेल्या ‘हॅप्पी द पंजाब’ या हॉटेलमध्ये घडली होती या संदर्भात
मिळालेल्या माहितीनुसार, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एक तरुणी रात्री नऊच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसमवेत सुतारवाडी, बंगलोर-मुंबई महामार्गालगत असलेल्या हॅप्पी द पंजाब या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. थोड्यावेळाने तरुणी स्वच्छतागृहात गेली, तिची आई बाहेर वाट बघत होती. पण त्यावेळी कोणीतरी लपून चित्रीकरण करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. लगेच तरुणी जोरात ओरडली, तिच्या आईने आणि तिने तातडीने हॉटेलच्या मॅनेजरला हा प्रकार सांगितला. हॉटेल मॅनेजरने तातडीने लागूनच असलेल्या पुरुषांच्या शौचालयामध्ये धाव घेतली आणि एका तरुणाला पकडलं. नंतर त्याला बाहेर आणून त्याच्याकडून मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्न सुरू असताना आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर हॉटेल प्रशासनाने प्रकरण मिटल्याचं खोटं सांगत वेटरला पुन्हा बोलावून घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे
दरम्यान, या प्रकरणी हाफिज अन्सारी नावाच्या आरोपी वेटरविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ‘354अ’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.