Home मराठवाडा मंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले ,...

मंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , ???

560
0

 

 

एक लग्न सोहळा ???

 

अमीन शाह ,

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात विवाहसोहळा सुरू असतानाच नवऱ्या मुलाला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . शेवटचे मंगलाष्टक सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला . लग्नाच्या वरातीतील ‘ डीजे ‘ आणि त्यावर नाचताना झालेल्या धावपळीला यासाठी दोष दिला जात आहे . कर्जत तालुक्यातील चिलवडी या गावात रविवारी जगताप आणि राऊत यांच्यात लग्नसमारंभ होता . मुलगी चिलवडीची आणि नवरदेव भूम ( जि . उस्मानाबाद ) येथील . दुपारची वेळ होती . वरात आणि अन्य सोपस्कार पूर्ण होऊन लग्न विधीला सुरुवात झाली . ग्रामीण भागातील पद्धतीनुसार शेवटच्या मंगलाष्टकापूर्वी थांबून उपस्थित मान्यवरांची ची आशीर्वादपर भाषणे झाली . ती संपून पुन्हा मंगलाष्टक सुरू होताच नवरदेवाला चक्कर आली . तो एकदम कोसळलाच . त्याला उचलून तातडीने राशीन येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले . तेथे डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात येण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले . त्यानंतर त्याला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . त्यानंतर पुढील सोपस्कार आणि शवविच्छेदन करण्यात आले . नवरदेवाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे आढळून आले .