Home विदर्भ चौहोट्टा बाजार येथील आठवडी बाजारातून महिलेच्या पर्समधील मोबाईल लंपास

चौहोट्टा बाजार येथील आठवडी बाजारातून महिलेच्या पर्समधील मोबाईल लंपास

67
0

कुशल भगत

अकोला – आकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असुन शुक्रवारी चोहोट्टा येथे आठवडी बाजार भरतो.या बाजारात खरेदीसाठी आलेल्या महीलेचा साड्यांच्या दुकानात साड्याची पाहणी करीत असतांना या महीलेच्या पर्स मधुन अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केला. लंपास झालेला मोबाइल opo कपंनीचा असुन त्याची किंमत 12000 रु असल्याचे कळते आहे. चोहट्ट्यातील आठवडी बाजारात मोबाईल चोर सक्रीय झाल्याचे समजते या
अज्ञात मोबाईल चोरट्यांकडे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज गणोजा बाग येथील काही महीला बाजारातील साडीच्या दुकानात साड्याची पाहणी करीत असताना अज्ञात चोराने या महीलेच्या पर्स मधील मोबाईल चोरुन पोबारा केला महीलेने जेव्हा पर्स मधील मोबाईल चेक केला तेव्हा पर्स ची चेन उघडी होती व पर्स मधे मोबाईल दिसुन आला नाही या महीलेने लगेच चोहोट्टा बाजार येथील पोलीस चौकी गाठली व पोलीसांना घडलेली घटना सांगितली दरम्यान या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.