Home विदर्भ आजंती शिवारात दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

आजंती शिवारात दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

105

 एकावर उपचार सुरू

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील अपघात

ईकबाल शेख

वर्धा / हिंगणघाट –  शहरा जवळील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील आंजती शिवारात गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एम एच ३२ ए.सी ५६३४ व एम एच ३२ ए.ई ७२६५ या दोन दुचाकीची समोरा समोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वाराचा मुत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच साय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर उमरे,पोलिस कर्मचारी ज्योती राऊत, गौरव खरवडे,अजय बेले,प्रदिप डोंगरे यांनी जखमी रमेश गोविंदाराव भोमले राहणार आजंती व पवन कुबडे राहणार हिंगणघाट या दोद्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रमेश गोविंदाराव भोमले यांनी उपचापुर्वी मुत्य घोषित केले.तर पवन कुबडे यांच्यावर उपचार सुरू आहे.या अपघाताची नोंद हिंगणघाट पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.