Home विदर्भ कृषी उत्पन्न बाजार सामितीतील विनापरवाना खाजगी व्यापाऱ्यांकडून कडून शेतकऱ्यांची होणारी लूट त्वरित...

कृषी उत्पन्न बाजार सामितीतील विनापरवाना खाजगी व्यापाऱ्यांकडून कडून शेतकऱ्यांची होणारी लूट त्वरित थांबवा – मनसे

115

कृषी उत्पन्न बाजार सामितीतील गाळेधारकांवर कार्यवाही करा….

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट सुरू असून विनापरवाना खाजगी व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे.तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळे धारकांनी आपले गाळे भाडेतत्वावर देऊन परजिल्ह्यातील व्यापारी येथे आणुन शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी करीत आहे.या सर्व भोंगळ कारभाराला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसेने आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातुन मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे यांनी केला.
यवतमाळ येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व सामान्य शेतकरी आपल्या मालाला भाव मिळेल या आशेने येतो परंतु येथे मात्र त्याची पिळवणूक सुरू आहे.परजिल्ह्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचा माल दलालांमार्फत खरेदी करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन शासन निर्धारित भाव ३७०० ते ४३०० चना ३७०० ते ४१५० ,तूर ४००० ते ६००० असतांना खाजगी व्यापारी शेतकऱ्यांचा माल दलालांच्या माध्यमातून कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहे.यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसून खाजगी व्यापाऱ्याच्या दावणीला या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांधले असल्याचा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सी.सी.टी.व्ही. हेतु परस्पर बंद ठेवण्यात आले आहेत . हा सर्व प्रकार जिल्ह्यात सरसकट सुरू असून या विनापरवाना माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी आणि आपले गाळे भाड्यावर लावून शेतकऱ्यांना लुटून परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे खिसे भरणाऱ्या गाळे धारकांवर कडक कार्यवाही करावी अन्यथा मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला.या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे,अमित बदनोरे,सादिक शेख, अभिजीत नानवटकर, मुकुंद जोशी यासह मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.