Home मराठवाडा मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेले डि जी लोन 31 जानेवारी पर्यंत मंजूर...

मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेले डि जी लोन 31 जानेवारी पर्यंत मंजूर करा अन्यथा – मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन

56
0

पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा

उस्मानाबाद – गेली दीड वर्षांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्रातील सुमारे 03 ते 04 हजाराच्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी DG लोन साठी अर्ज दाखल केले आहेत , त्यांचे लोन लवकरात लवकर मंजूर करा या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे व त्यांचे असोसिएशनचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष यांनी 07 महिन्यांपासून म्हणजेच जून 2020 पासून सतत गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना प्रत्येक जिल्ह्यातून निवेदने दिली आहेत तसेच मुंबईत जनता दरबारात सुद्धा 5 ते 6 वेळा DG लोन कधी मंजूर होणार हा प्रश्न विचारला होता तसेच नागपूर येथे प्रत्यक्ष भेटून गृहमंत्री साहेबांना निवेदनही दिले होते त्यावर लवकरच प्रश्न मार्गी लावू असे उत्तर दिले होते, परंतु अद्यापही या सरकारने DG लोन मंजूर केले नसल्यामुळे दिनांक 08 जानेवारी 2021 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना 31 जानेवारी पर्यंत DG लोन मंजूर करा अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे फेब्रुवारी महिन्यात मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशारा दिला.