Home विदर्भ घाटंजी तालुक्यात १५ जानेवारी रोजी होउ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू

घाटंजी तालुक्यात १५ जानेवारी रोजी होउ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू

77
0

दोन टप्प्यात ५० गावाची निवडणूक होणार..? 

 

अयनुद्दिन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यात पहील्या टप्प्यात २४ व दुसऱ्या टप्प्यात २६ असे एकुन ५० ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून निवडणूक चांगल्या तर्‍हेने पार पाडण्यासाठी महसुल व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. विशेषतः पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १८ जानेवारी रोजी लागणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सरपंच पदाचे रोष्टर मात्र ग्रामपंचायत निवडणूकीनंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच पदाचे दावेदार सद्यातरी संम्रभात आहे.
घाटंजी तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी कुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिन गट उभे ठाकले असून माजी सरपंच नरसिंगराव मुत्यालवार व माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी गट, जयप्रकाश काटपेल्लीवार, रमेश यमसनवार यांचा माजीमंत्री अँड. शिवाजीराव मोघे गट व मल्लेसु बोदुलवार व भाउ कुमरे यांचा आमदार डाँ. संदीप धुर्वे व माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गट निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावत असून माजी सरपंच नरसिंगराव मुत्यालवार व माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी या गटाने सतत १० वर्ष सत्ता उपभोगली आहे. तसेच या पुर्वी सुध्दा त्यांनी ५ वर्ष सत्ता भोगली आहे.
कुर्ली ग्रामपंचायत निवडणूकीत खालील प्रमाणे उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे.
◼️ माजी सरपंच नरसिंगराव मुत्यालवार व अयनुद्दीन सोलंकी गट :- शेडमाके उकंडराव नागोराव, भालशंकर रसिका संघदीप, राठोड जनाबाई लक्ष्मण, जलालुद्दीन अयनुद्दीन सोलंकी, खोडे राजेंद्र आनंदराव, धुरपता नागोराव शेडमाके, रेड्डीवार विलास आशन्ना, किणाके पार्वती यशवंत, आंबटवार शांताबाई अभयजित
जयप्रकाश काटपेल्लीवार व रमेश यमसनवार गट :- मेश्राम लक्ष्मण नामदेव, भालशंकर साधना चंद्रशेखर, अंगावार सरीता रमेश, जाधव फुलचंद हिरामण, आत्राम संजय तुकाराम, कीणाके मीराबाई हनमंतु, गड्डमवार सतिश लचमारेड्डी, आत्राम जोत्स्ना आकाश, बंडीवार ललीता देवन्ना, मल्लेसु बोदुलवार व भाउ महादेव कुमरे गट :- अनिल भिमराव कुडमते, विजया अनिल मंत्रीवार, प्रतिमा राकेश बंडीवार, नरहरी दत्तुपंत पोलकमवार, भाउ महादेव कुमरे, तुळसाबाई विठ्ठल शेडमाके, मल्लेसु गंगारेड्डी बोदुलवार, किरण मोहन मेश्राम, लक्ष्मी सुभाष चौधरी ईत्यादी उमेदवार ग्रामपंचायत निवडणूकीत आपले भाग्य आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार पुजा माटोडे, निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. मेंढे, निवडणूक लिपीक मानवटकर, श्री. पाली आदी ग्रामपंचायत निवडणूका निष्पक्ष होण्यासाठी प्रयत्नरत आहे.
दरम्यान, घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला यांची प्रतिक्रिया घेतली असता, ग्रामपंचायतीच्या निवडणूक काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी पोलीसवाला आँनलाईन मिडीया ला सांगीतले.