Home मराठवाडा रेतीच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी टॅक्टर जप्त

रेतीच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी टॅक्टर जप्त

132

गुलाम मुस्तफा अन्सारी

पाथरी , दि. १५ :- तालुक्यातील ढालेगाव गोदा पात्रातून अवैध प्रकारे रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाच्या वतीने ११ जानेवारी रोजी आढळून आल्याने ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

पाथरी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करून बेकायदेशीररित्या रेतीची चढ्या दराने विक्री होत आहे . या प्रकरणी महसूल प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी गस्त देत आहे . पाठीमागील काही महिन्यापासुन गोदापाञ रेतीची अवैधरीत्या विनापरवाना उत्खनन करुन वाहतूक होत आहे .

या प्रकरणाला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी गस्तीची उपायोजना अवलंबली जात आहे . अशातच शुक्रवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास गोदा पात्रातून बेकायदेशीर विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा टॅक्टर आढळून आल्याने गस्तीवर असलेल्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने महसूल प्रशासनाकडून ट्रॅक्टर जप्त करून पाथरी पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आला. बाभळगाव मंडळाचे मंडळाधिकारी प्रकाश गोवंदे आणि लोणी सज्जाचे तलाठी सचिन शिंदे हे गस्तीवर असताना त्यांना विनापरवाना अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारा टॅक्टर आढळून आल्याने त्यांच्या कडून जप्तीची कारवाई करण्यात आली.