
माते सह प्रियकरास अटक ,
अमीन शाह ,
पहिल्या पतीपासून जन्मलेल्या सात वर्षाच्या मुलाचा सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने भिंतीवर डोके आपटून खुन केल्याचा प्रकार नाशिक पोलिसांनी उघडकीस आणला आहे . आई आणि तिचा प्रियकर यांना अटक केली आहे . साईनगर येथे अंगणात खेळत असताना मोहित घनश्याम जाधव या सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती . जिल्हा शासकीय रुग्णालयात या मुलाला आणण्यात आले होते . आडगाव पोलिसांनी याची अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती . मुलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात तसाच सोडून त्याची आई संशयित सुलोचना सोमनाथ कु – हाडे व सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कु – हाडे ( वय २३ , रा . साईनगर , नांदुरनाका ) हे दोघे फरार झाले होते . त्यामुळे पोलिसांनी संशय आला . वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी मुलाच्या आईवडिलांचा शोध घेण्याचा आदेश दिला . त्यांच्या घरात मिळालेल्या धागेदोऱ्यांवरुन सोमनाथ याला पेठ रोडवरील वसाहतीतून अटक तर , सुलोचना हिला कोपरगाव येथून पकडण्यात आले . दोघांनी मुलाला मारल्याची कबुली दिली . पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यावर सुलोचना हिचे सोमनाथबरोबर संबंध निर्माण झाले . मुलगा मोठा झाल्याने त्याला दोघांच्याबाबत संशय येऊ लागला . त्यामुळे अनैतिक संबंधात मुलाचा अडसर होऊ लागल्याने त्यांनी मुलाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा खुन केल्याची कबुली दिली . दोघांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे .











































