Home विदर्भ 31 डिसेंबरच्या पूर्व रात्री आर्वी पोलीसांनी केली अवैध दारु जप्त

31 डिसेंबरच्या पूर्व रात्री आर्वी पोलीसांनी केली अवैध दारु जप्त

291

अवैध दारुवाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही एकुण ५,६३,९००/- रु.चा मुद्देमाल जप्त

रविन्द्र साखरे

वर्धा / आर्वी – ३०.१२.२०२० रोजी रात्री ०१.०० वाजताचे दरम्यान मुखबीरच्या खात्रीशीर खबरेवरून नांदपूर, ता. आर्वी या ठिकाणी नाकेबंदी करुन मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.-३२/बी-०९५८ थांबवून तपासणी केली असता चालक आरोपी नामे श्याम निळकंठ सोनटक्के, वय ३९ वर्ष, रा. रामनगर, वर्धा हा विदेशी दारूच्या ७६६ निपा एकूण किंमत १,६३,९००/- रु. ची अवैध दारू वाहतूक करीत असतांना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करून विदेशी दारू किंमत १,६३,९००/- रु. व मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.-३२/बी-०९५८ किंमत ४,००,०००/- रुपये असा एकूण जुमला किंमत ५,६३,९००/- रु. चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव तृप्ती जाधव यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार अमोल बरडे, सुनिल मळणकर, सचिन धुर्वे, अमोल आलवटकर, श्याम गावनेर, किरण कुरटकर सर्व पोलीस स्टेशन आर्वी यांनी केली.