Home विदर्भ एस टी महामंडळ व पत्रकार समिती तळेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

एस टी महामंडळ व पत्रकार समिती तळेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

119

ईकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं.) –  मागील वर्षभर्‍यापासुन संपुर्ण देश कोरोना विषाणु महामारीच्या विरोधात लढत असतांना कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये याकरिता साईबाबा उत्सव समिती.एस टी महामंडळ व पत्रकार समिती तळेगाव यांचे वतीने उड्डाण पुला खाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशन तळेगाव .एस टी महामंडळ तळेगाव व स्थानिक नागरिकांनी स्वयफुर्तीने रक्तदान करीत शिबिरात सहभाग नोंदविला़. यामध्ये ४० एकुन रक्तदात्यांनी रक्तदानात भाग घेतला़ तसेच सोबतच एस. टि. महामंडळाच्या कर्मचार्‍यांची ई.सी.जी. व ब्लड शुगर तपासनी यावेळी करण्यात आली. प्रत्येक रक्तदात्याला मास्क, सेनीटायझर, प्रमानपत्र व ऐक भेटवस्तु देण्यात आली याप्रसंगी एस. टि. महामंडळाचे कर्मचारी, साईबाबा उत्सव समितीचे कार्यकर्ते व तळेगाव येथील समस्त पत्रकार यांच्यासह रेनबो रक्तपेढी, नागपुर व त्यांच्या टिमचे सहकार्य लाभले़ विशेषत: रेनबो ब्लड अॅन्ड कंपोनंट बॅक नागपुर तर्फे याप्रसंगी आगार प्रमुख विद्या ठाकरे, पत्रकार प्रविण करोले तळेगाव यांना कोरोना योद्धा प्रमानपत्र देवुन गाैरविण्यात आले.

रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली़ शिबिरस्थळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन रक्तदात्यांसाठी सोय करण्यात आली होती़ शिबिरात वारंवार सॅनीटायझर याचा वापर करुन उपस्थितांचे हात निर्जंतूनीकिरण केले जात होते़ दरम्यान, रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला़.

साईबाबा पुण्यतिथी उत्सवात पडला खंड

दरवर्षी एस.टि. महामंडळ व साईबाबा उत्सव समिती. यांचे वतीने वर्षाच्या शेवटच्या गुरुवारी होणारा साईबाबा पुण्यतीथी महोत्सव व संपुर्ण गावाला वितरीत करण्यात येणार्‍या महाप्रसादाचा कार्यक्रम यावर्षी कोरोना विषाणु मळे रद्द करण्यात आला असुन फक्त विधीवत पुजाअर्चा करुन उत्सव समिति कडुन साजरा करण्यात आला.