Home विदर्भ आठवडी बाजार येथील क्रिकेट सट्यावर यवतमाळ पोलीसांची धाड

आठवडी बाजार येथील क्रिकेट सट्यावर यवतमाळ पोलीसांची धाड

275

यवतमाळ – आठवडी बाजार येथील नितीन उर्फ राम चिमपलाल शर्मा ( ३२ ) याच्या राहत्या घरी पोलीसांनी छापा मारला असता क्रिकेटचा सट्टा खेळणार्या चार अरोपांना ताब्यात घेवून ६ लाख ५० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीसांनी ही कारवाई दिनांक २८ डिसेंबर रोजी यवतमाळ पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली . नितीन उर्फ राम चिमपलाल शर्मा ( ३२ ) , निलेश अर्जुन नान्हे ( २६ ) , दुर्गेशसिंग मोतीसिंग राणा ( २४ ) सर्व आठवडी बाजार यवतमाळ तसेच विक्रम विजय गहरवाल ( ३२ ) रा.साई मंदिर जवळ यवतमाळ असे पोलीसांनी अटक केलेल्या अरोपांची नावे आहेत . सध्या ऑस्ट्रेलिया येथील अत्यंत लोकप्रिय असलेली क्रिडा स्पर्धा Big Bash League T – 20 क्रिकेटचे सामने सुरु अहे . जगभरातील क्रिकेट प्रेमीने अमाप मनोरंजन असणारी ही मैच कधी सुरु होते याबाबत जशी उत्सुकता असते तेवडीज उत्सुकता या स्पर्धा दरम्यान ऑनलाईन बेटिंग सट्टा खेळवाणार्यांना बुकींग करणार्यांना सुध्दा असते , दिनांक २८ डिसेंबर रोजी थेट क्रिकेट मैच प्रक्षेपण BigBash League T20 – Adelite विरुध्द Parth हा सामना . चालु असतांना यवतमाळ पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील – भुजबळ यांनी सदर बेटिंगसह सट्टा चालविणाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून अशा काही हालचाली आढळल्या व त्यावर त्वरीत कायदेशिर कार्यवाही करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी , सायबर काईम बॉच यवतमाळ यांना सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे गोपनीय बातमीदार यांना सतर्क केले होते . दिनांक २८ डिसेंबर रोजी पोलीसांचा छापा झालेल्या गोपनिय माहितीवरून सायंकाळच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी अगामे यांचे नेतृत्वाखालील पथकाने नितीन उर्फ राम चिमपलाल शर्मा रा.अठवडी बाजार , यवतमाळ याचे राहते घरी छापा मारुन चार अरोपांना एलईडी टीव्ही वर थेट क्रिकेट मैच प्रक्षेपण Big Bash League T20 – Adelite विरुष्ट Parth हा सामना चालू असतांना हॉट लाइन व मोबाईल फोन व्दारा क्रिकेट मटक्यावर आकडे घेताना , लैंपटॉप व कागदावर क्रिकेट सट्याची नाेंदी करताना सापडले . नमुद सर्व अरोपीच्या ताब्यातून क्रिकेट बेटिंगसाठी लागणारे सर्व साहीत्य एक हॉट लाईन १६ मोबाईल कनेक्शन असलेली ( पोपट लाईन डब्बा ) , एक लंपटॉप , पिंटर , एइंडो टीव्ही , २५ मोबाइल , एक मोटर सायकल व इतर साहित्य , रोख रक्कम , ३ लाख १८ हजार ८६० रुपये असा एक लाख ५० हजार १६० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्यावरून पोलीस स्टेशन अवदुतवाडी येथे कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रति अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे , सदरची कार्यवाही पोलीस अधिकारी यवतमाळ दिलीप पाटोल – भुजबळ , अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.के.ए धरणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक जगासे , पोलीस हवालदार गजानन डोंगर , उल्हांस करकटे , कवित्र पाळेकर , पो. कॉ. किशोर झंडेकर , पंकज गिरी , अजय नियोळकर सतिष मोनाने ,मोहन सिमा बोबडे , प्रमिला डर , मनिता देवगडकर मिलती तरोणे , पोलीस अधिक्षक कार्यालय , यवतमाळ यांनी केली असून त्यांना या उत्कृष्ट कामागरी बद्दल पोलीस अधिक्षक यांनी वरील कारवाई बद्दल रोख २५ हजार रुपयाचे बक्षिश जाहीर केले .