Home विदर्भ सावली हिंगणघाट मार्गावर टिप्परची ॲटोला धडक २ महिलांचा मुत्यू ७ जण गंभीर...

सावली हिंगणघाट मार्गावर टिप्परची ॲटोला धडक २ महिलांचा मुत्यू ७ जण गंभीर जखमी जमावाने टिप्पर पेटविले

39
0

ईकबाल शेख

वर्धा – हिंगणघाट नंदोरी मार्गावरील सावली शिवारात हिंगणघाट वरुन शेतात कापूस वेचणी करीता ॲटोने जात असलेल्या शहरातील संत चोखोबा वार्डातील महिलांच्या ॲटोला टिप्पर जबर धडक दिली. या अपघातात ॲटोला मधील दोन महिलांचा मुत्यू झाला तर अन्य ७ महिला व ॲटो चालक असे आठ जण गंभीर जखमी झाले घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटविले.

 

 

https://youtu.be/ukcVQBYloXM

 

 

व्हिंगणघाट शहरात संत चोखोबा वार्डातील महिला नेहमी प्रमाणे कापूस वेचणी करीता नंदोरी कडे ॲटो क्रमांक MH32C9614 ने जात असताना समोरून येणाऱ्या टिप्पर क्रमांक MH32-AJ 2609 ने ॲटोला जबर धडक दिली या अपघात या अपघात दोन महिलांचा मुत्यू झाला तर अन्य ६ महिला व ॲटो चालक गंभीर जखमी झाला सर्व जखमींना उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यातील काहिंची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढिल उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी संतप्त जमावाने टिप्पर पेटविले.घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्त्यावर वाहतूक सुरळीत केली पुढिल पोलिस तपास सुरू आहे.