Home विदर्भ व्हील्स इंडिया सोबतची बैठक निष्फळ ; कामगार सामूहिक आत्मदहनावर ठाम.!

व्हील्स इंडिया सोबतची बैठक निष्फळ ; कामगार सामूहिक आत्मदहनावर ठाम.!

96

योगेश कांबळे

वर्धा – हील्स इंडिया कंपनीतील ३ वर्षांपासून कामावरून कमी केलेल्या १० कामगारांना कामावर घेण्यासबंधी कंपनी प्रशासन व कामगारांमधील बैठकीत तोडगा निघाला नाही.
देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितिन लेव्हरकर यांच्या पुढाकाराने कंपनी प्रशासन,कामगार व युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक घडवून आणली मात्र कंपनीच्या हेकेखोर प्रवृत्तीमुळे बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही.कामगारांनी कंपनीला ८ दिवसांचा अल्टीमेंटम दिला आहे.८ दिवसांत कामगारांना पूर्वरत कामावर रुजू न केल्यास कामगार कंपनीच्या गेट समोर सामूहिक आत्मदहन करण्यावर ठाम आहेत.
या बैठकीत व्हील्स इंडिया कंपनी कडून कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सुनील बुचे,सहायक व्यवस्थापक आशिष अडपवार,युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे,प्रवीण कात्रे,गौतम पोपटकर,वैभव नगराळे,पत्रकार समीर शेख व कामगार उमेश बोरकर,अफसर,समीर मानकर,राकेश भगत,श्रीकांत सोनटक्के,अभय ताकसांडे,अरविंद राजूरकर,जयंत चव्हाण,नितीन खारकर,सुरज लेवाडे, किरण फुलमाळी,महेश फटींग,नितीन ठाकूर,मोहमद शेख,मोहित कोसे,सागर पाल यांची उपस्थिती होती.