Home नांदेड रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त; महसूल पथकाची कारवाई !

रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त; महसूल पथकाची कारवाई !

35
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि:२६:- माहूर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने गौण खनिज तस्करीला आळा घालण्याची मोहीम जोरात सुरु केली असून या मोहिमे अंतर्गत महसूल विभागाच्या पथकाने दि.२४ रोजी दुपारी ३ :०० वा.च्या मदनापूर येथील रेती तस्करी करणारा ज्ञानेश्वर नारायण टनमने यांचा ९५०० मॅसी फर्ग्युसन हा लाल रंगाचा विना नंबरचा ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या पथकात मंडळ अधिकारी सुगावे, पदकोंडे, तलाठी भानुदास काळे, येर्डलावार यांचा समावेश होता. माहूर तालुक्यात सर्वत्र विना नंबरच्या ट्रॅक्टर व टिप्परने रेती तस्करीला मोठ्या प्रमाणात जोर चढलेला दिसत असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा निश्चय करून महसूल विभागाने रेती तस्करी विरुद्ध धडक मोहीम सुरु केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ट्रॅक्टरचालक राजु सीताराम राऊत यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याची माहिती असून रेती तस्कर महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत शिताफीने रेती तस्करी करण्याचा प्रयत्न करीत असल्याने महसूल विभागही आता सतर्क झाला असून या कारवाईने मदनापूर परिसरासह संपूर्ण तालुक्यात महसूल विभागाच्या पथकाचे कौतुक होत आहे.

” सदर वाहन विना नंबर चालविल्याने त्यावर प्रशासन कोणती कारवाई घेईल याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे . तालुक्यात विना नंबर चालविण्यासाठी प्रोत्साहन प्रशासन देतील का ?

” फक्त दंड भरून ट्रॅक्टर सोडल्यास चार दिवसांमध्ये रेतीच्या उत्पनावर दंडाची रक्कम मिळवले जाईल अशी नागरिकातून चर्चा होताना दिसत आहे