Home विदर्भ महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेची सेवाग्राम येथे कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेची सेवाग्राम येथे कार्यशाळा

103

योगेश कांबळे

वर्धा –  महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील {असो} संघटनेची कार्यशाळा बापूकुटी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे 24 डिसेंबर रोजी पार पडली.
या कार्यक्रमाला संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव रावजी नागरगोजे पाटील राज्य महासचिव वैरागडे पाटील राज्य प्रसिद्धीप्रमुख गायकवाड पाटील तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पोलीस पाटील बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यशाळेला नागरगोजे पाटील यांनी मार्गदर्शन केले. वैरागडे पाटील व निरंजन गायकवाड पाटील यांनीसुद्धा यावेळी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यामध्ये वर्धा जिल्हा कार्याध्यक्षपदी मनोज हिवरकर पाटील तर जिल्हाध्यक्षपदी सागर खोंडे पाटील यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी श्याम काकडे पाटील यांची निवड करण्यात आली .ही कार्यशाळा पार पडण्यासाठी सर्व पोलीस पाटील यांचे खूप सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज हिवरकर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शाम काकडे पाटील यांनी केले