Home विदर्भ किनवट प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात….!

किनवट प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात….!

176

यवतमाळ –  किनवट तालुक्यातील सोन्याचे नाणे कमी दरात देण्याच्या चित्रपट स्टाईल ने तीन लाख नव्वद हजार रुपये उकळल्याच्या प्रकरणात  मारेगाव येथून तीन संशायित आरोपीस आज शुक्रवार ला किनवट पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर या प्रकरणातील पांढरकवडा येथील चौथ्या आरोपीस ताब्यात घेतले.चौघांना किनवट पोलिस स्टेशन मध्ये अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी ” एल्गार ” ला दिली.

 मारेगाव येथील स्कॉर्पिओ कार टोळीने नांदेड़ जिल्ह्यातील किनवट येथे एकास अत्यल्प दरात सोन्याचे नाणे देण्याचे आमिष दाखवून किमान ३ लाख ९० हजार लुटून पोबारा केला.विशेष म्हणजे यात वापरलेल्या कार समोर पुर्वी पासुन व्ही.आय. पी.लिहिलेले आहे तर ठळक शब्दात ‘ पोलिस ‘ अशा पोलिस खात्याच्या शब्दाचा बनाव व तोतयागिरी करित षडयंत्र रचण्यात आले.त्यानूसार सावज टीपण्याच्या ऊद्देशाने सोन्याच्या नाण्याचा “चारा ” टाकण्यात आला.त्यात अलगद स्वस्त सोन्याच्या  लालसेपोटी मासा गळाला लागला.

   मात्र,वास्तवात सोने नव्हतेच त्यामुळे वाटमारीचे बनाव करित स्वत:च्याच प्याद्याला तोतया पोलिसांचा बनाव करित रकमेसह घटना स्थळावरुण पोबारा केला.गुन्ह्याला थारा नसतो या ब्रीदवाक्याचा गुन्हेगारी घटनेत सुद्धा प्रत्यय आला आणी मोबाईल   ने पितळ उघडे पडले.आणी थेट आरोपींना ताब्यात घेण्यास किनवट पोलिस पथक मारेगाव येथे दाखल होत मुख्य आरोपी मंदा ठमके,चालक अश्विन पडग्याळ,परशुराम प्रसाद यांना ताब्यात घेतले.तर पांढरकवडा येथून अनिल भेदुरकर यास ताब्यात घेत चौघांस किनवट पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली.त्यांचे कडुन तुर्तास १४ हजार २०० रुपये जप्त करण्यात आले.उद्या चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असुन पुढील तपास किनवट पोलिस करित आहे.