Home विदर्भ सामाजिक संघटना, प्रशासन व जनता यामधील सुसंवाद साधण्याचे माध्यम – संदिप चिचाटे

सामाजिक संघटना, प्रशासन व जनता यामधील सुसंवाद साधण्याचे माध्यम – संदिप चिचाटे

88

वर्धा –  वर्षभरापासुन कोरोनाने विळखा घातला असून अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे कोरोना काळात प्रशासन भूमिका नीट बठवित असताना जनतेसोबत सुसंवाद साधण्यासाठी सामाजिक संघटना महत्वपूर्ण कार्य बजावते असे गौरवोदगार लॉयन्स क्लबचे अध्यक्ष संदीप चिचाटे यानी वर्धा पोलिस स्टेशन येथे आयोजित सॉनीटायझर वितरन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. त्याप्रसंगी पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार , डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप खंडेलवाल, ऑक्टीवीटि चेअरमन डॉ. रिपल राने , रीजन चेअरपर्सन शुभदा रूद्रकार , संचालक अनिल नरेडी, संजय आदमने , गंगाधर पाटील, प्रकाश खंडार, हरीश तांदळे, विजय नाखले, प्राजक्ता मुते, मोहित सहारे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीयार यानी कोरोना काळात सॉनीटायझर मशीन सामाजिक स्वास्थ्य टीकवण्यात मदत करित असुन वैयक्क्तीक स्वास्थाबरोबर सामाजिक स्वास्थ्य जपने मह्त्वाचे असल्याचे मत नोंदवीले. तसेच डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संदीप खंडेलवाल यांनी प्रशासनाला सहकार्य करण्यात लॉयन्स क्लबने संपुर्ण महाराष्ट्रभर महत्वपूर्ण भूमिका बजाविल्याचे मत नोंदविले . तर डॉ. रिपल राणे यानी हात धुने, विषणू नाशकाचा वापर करणे, मास्क बांधने, कोरोनाला प्रतिबंध घालवण्यात प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन मोहित सहारे तर आभार अनिल नेरडी यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिप्ती चव्हाण, प्रतिक पराते, अर्शीया बेग, आकाश जांभुळकर , सुमित नेवारे , सांरग नेवारे, औजळ सामाजिक संस्था, फुटपाथ स्कूल व पोलिस प्रशासनाने प्रयत्न केले.