Home विदर्भ हैद्राबाद रामटेक नागपूर बसला कीन्ही येथे थांबा – मनसे पांढरकवडा आगार व्यवस्थापकांना...

हैद्राबाद रामटेक नागपूर बसला कीन्ही येथे थांबा – मनसे पांढरकवडा आगार व्यवस्थापकांना निवेदन

39
0

यवतमाळ / राळेगाव – विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वडणेर येथे जावे लागते परंतु त्यांना याठिकाणी येण्यासाठी बस मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी मनसेच्या वतीने रामटेक नागपुर हैद्राबाद या बसला किन्ही येथे थांबा द्यावा व त्यांच्या पासेस स्वीकारण्यात याव्यात यामागणीसाठी 

पांढरकवडा आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
राळेगाव तालुक्यातील किन्ही परिसरातील विध्यार्थी विध्यार्थीनींना शिक्षणासाठी वडणेर ला जावे लागते त्या करता त्यांना बस सुविधा मिळण्या करीता शासनाने बसची व्यवस्था केलेली आहे परंतु यांमध्ये रामटेक आगराची हैदराबाद रामटेक नागपूर ही बस कीन्ही येथे थांबत नाही आणि पासेस स्वीकारत नाही तसेच या बस मंध्ये विद्यार्थी बसले असता पासेस स्वीकारल्या जात नाही या मुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी बरोबर च शैक्षणिक अडचण निर्माण होत आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष घालून या सदर बसला राळेगाव तालुक्यातील कीन्ही येथे थांबा द्यावा व विध्यार्थ्याचे होणारे नुकसान टाळावे सदर बसला कीन्ही येथे थांबा मिळावा व सदर बस मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पास स्वीकारण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन पांढरकवडा आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.
यावेळी मनसे राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर वरघट, रविभाऊ वाल्लमवार, वडकी विभाग अध्यक्ष संदीप गुरनुले मंगेश मांदाडे उपस्थित होते.