Home विदर्भ तळेगांव दत्त गडावरील शिखर यात्रा या वर्षी रद्द

तळेगांव दत्त गडावरील शिखर यात्रा या वर्षी रद्द

48
0

ईकबाल शेख

वर्धा , दि. २५ :- तळेगांव (श्या. प) : – श्री गुरु दत्तात्रय देवस्थान (गड) येथे दरवर्षी दत्त जयंती यात्रा व उत्सवासाठी तळेगांव व आसपासच्या गावांतील हजारो भाविक दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात. मात्र सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारी मुळे शासनाच्या नियमाच्या आधीन राहून तळेगांव (श्या.प.) येथील श्री गुरुदत्तात्र देवस्थान गड संस्थानने यावर्षी दत्त जयंती सोहळा अगदी साधेपणाने मंदिर परिसरात विधिवत पद्धतीने साजरा होणार असुन सुमारे सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात भाविकांनी मंदिर परिसरात न येता घरी राहूनच हा सोहळा साजरा करावा व या दरम्यान मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये तसेच गुरु दत्तात्रय देवस्थान गड परिसरात उत्सवादरम्यान तिन दिवस भरत असलेली शिखर यात्रा व उत्सव कोविड 19 कोरोना महामारी मुळे रद्द करण्याचा निर्णय श्री गुरु दत्तात्रय देवस्थान (गड) कमेटी ने घेतला असून यात्रेकरीता येणार्‍या दुकानदारांनी व यात्रेकरुनी कमेटीने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन श्री गुरू दत्तात्रय देवस्थान (गड)कमेटी तळेगाव (श्यामजी पंत)) यांनी केले आहे.