Home विदर्भ “नियतीने साळ्यालाही हिरावले”, भाऊजीचा अंत्यसंस्कार करुन परतणाऱ्या साळ्यावर काळाचा घाला 

“नियतीने साळ्यालाही हिरावले”, भाऊजीचा अंत्यसंस्कार करुन परतणाऱ्या साळ्यावर काळाचा घाला 

36
0

बोटोणी नजीक अपघातात मामा..

 ठार तर भाचा गंभीर जखमी….!

 यवतमाळ /  मारेगाव – यवतमाळ येथून वडीलाचा अंत्यसंस्कार आटोपून धीरगंभीर मनाने स्वगावी परतणाऱ्या मामा भाचाच्या दुचाकीला बोटोणी नजीक इंण्डेन गैस खाली वाहनाने जबर धडक देवून या अपघातात मामा जागीच ठार तर भाचा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना दि.२३ बुधवारला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली.

वणी तालुक्यातील चिखलगाव वामन लोहबळे यांचा यवतमाळ येथे मृत्यू झाल्याने मुलगा रमेश लोहबळे  व त्याचा मामा सुरेश लोनबळे    हे दोघे अंत्यसंस्कार आटोपून स्वगावी दुचाकी क्रमांक एम.एच.२९ ए.आर.६३२ ने परतत असतांना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणार्या इंण्डेन गैस ट्रक क्रमांक एम.एच.०४ ई .बी.८१३२ ने दुचाकीला बोटोणी नजीक असलेल्या धाब्या समोरील राज्य महामार्गावर जबर धडक दिली.या अपघातात मामा नामे सुरेश वामन लोनबळे (५०) रा.चिखलगाव ता.वणी यांचा जागीच करुन अंत झाला तर भाचा रमेश लोहबळे (३५)रा.चिखलगाव हा गंभीररित्या जखमी झाला आहे.जखमी रमेश यास मारेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे.     दरम्यान, अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळा वरून ट्रकसह पांडवदेवी मार्गे जंगलात ट्रक सोडून  पलायन करण्याचा प्रयत्न केला.मात्र ट्रक चालकाच्या तळीराम भूमिकेने जंगलाच्या दिशेने जात असतांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेवुन चालक नंदकिशोर सुखदेव साबळे (३१)रा.बेलखेड ता.कारंजा जी.वाशीम यास अटक केली.
    परिणामी भाऊजीच्या अचानक मृत्युने अखेरचा निरोप देत परतीचा प्रवास करणार्या साळ्यावर नियतीने काळाचा घातला तर मृतकाच्या भाच्यावर गंभीररित्या जखमी होण्याच्या दुर्देवी घटनेने  येथील लोनबळे व लोहबळे कुटुंबियासह चिखलगाव येथे शोककळा पसरली आहे.