Home विदर्भ आर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत मटेरियल सप्लायच्या कामात अनियमितता?

आर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत मटेरियल सप्लायच्या कामात अनियमितता?

223

वर्धा , दि. २४ :- आर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या मटेरियल सप्लायच्या कामात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद वर्धा यांनी १२/२/२०२० ला परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकाचे योग्य रितेने पालन होत नसल्याचा आरोप कंत्राटदार कल्याण संघटने चे अध्यक्ष किशोर मिटकरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद वर्धा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परिपत्रका नुसार एक लक्ष च्या कमी वस्तुंची ई – निविदा निघत आहे व सर्व मटेरियलची एकच निविदा निघत आहे. मटेरियल सप्लायच्या कामात तीन पेक्षा जास्त कंत्राटदार आल्यास त्यांचे टेंडर कोणतेही कारण नसतांना रद्द करत आहे.

मटेरियल सप्लायच्या ९० टक्के कामात फक्त नेहमीच तीनच ठेकेदार असतात व टेंडर मॅनेज होतात. जर ठेकेदार निविदांचा लिफाफा उघडल्यानंतर मागे हटण्यास तयार नसल्यास त्याला ग्रामपंचायतमधून कोणतेही कारण नसतांना ठराव घेऊन निविदा रद्द करण्यात येत आहे. तसेच मटेरियल सप्लायच्या कामास लागणारे मजुर हे आधारलिंक नसल्याच्या खात्यात पैसे टाकण्यात येत आहे. यात बोगस मजुर आहेत. काही ग्रामपंचायत ठेकेदाराच्या नावाने मजुरीची रक्कम दिली गेली आहे. मटेरियल सप्लायच्या कामासाठी ग्रामपंचायतकडे कोणताही तज्ञ व्यक्ती राहत नाही असे निवेदनात म्हटले आहे.

जे काम मॅनेज आहे किंवा मॅनेज केलेले आहे तेथे दुसऱ्या ठेकेदारांनी कमी दराचे रेट टाकल्यावरही फक्त १५ दिवसाची मटेरियल टाकण्याची मुदत देतात व त्यांनी नाही टाकल्यास त्यांचे टेंडर तुरंत रद्द करू असे पत्र देतात. परंतु काही सरपंचाचे ठेकेदार सहा महिने ही मटेरियल टाकत नाही व त्यांचे टेंडर रद्द का होत नाही हा प्रश्नच आहे. तरी या सर्व बाबींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी व मटेरियल सप्लाय सर्व टेंडर रद्द करून बी – १ टेंडर काढण्याची विनंती केली आहे.