Home नांदेड प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान ब्रिगेडचा मोर्चा धडकला तहसील...

प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान ब्रिगेडचा मोर्चा धडकला तहसील कार्यालयावर.

111

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : २१:- शेतक-यांचे विविध प्रश्न घेवून प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात किसान ब्रिगेडचा मोर्चा दि.21 डिसें.रोजी माहूर तहसील कार्यालयावर धडकला.त्याठिकाणी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना पोहरे यांनी मोदी सरकारने आणलेले शेतीविषयक कायदे आज जरी आणले असले तरी अदाणी,अंबानी या व्यापा-यांनी तिनवर्षा पूर्वी पासूनच धान्याची साठवणूक करण्यासाठी जागोजाग गोदाम बांधण्याचे काम सुरू केल्याचे स्पष्ट करून मोदी सरकार सरकार भांडवलदाराचे असल्याचा व .शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून विमा मिळत नसल्याचे प्रश्नावर विमा कंपनीने 21 हजार कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आणि कोरोनाचे निमित्त पुढे करून देशात अघोषित आणिबाणी लावल्याचाह घणाघाती आरोप केंद्र सरकारवर केला.माहूर तालुक्यातील जिनिंगचे भांडवल भंगारात विकून खाल्याचे तसेच उनकदेव सहकारी साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले शेअर्स गिळंकृत केल्याचे प्रकरण फारच गंभीर असल्याची त्यांनी कबुली दिली.
सोमवारला पार पडलेल्या मोर्चा मध्ये किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे , विभागीय अध्यक्ष डॉ. दत्ता मोरे, प्रदेश समन्वयक प्रकाश बुटले,अविनाश काकडे यांचेसह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सभेच्या ठिकाणी येऊन स्वीकारलेल्या निवेदनात तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा तातडीने लाभ द्या, महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा तात्काळ लाभ द्या, भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून संथ गतीने सुरू असलेल्या पिक कर्ज वाटपाला गती द्या, रब्बी हंगामात विद्युत पुरवठा अखंडीत सुरू ठेवा,विद्युत पुरवठा अखंडीत ठेवण्याच्या मार्गात येणारा अडथळा दूर करा, तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील प्रभारी राज हटवा, कायम स्वरुपी तालुका कृषी अधिका-यांची नियुक्ती करा, धनोडा ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या धुळीने व मोठया प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या ,त्या संदर्भात संबंधीतावर कारवाई करा आदि मागण्यांचा समावेश आहे.
प्रकाश बुटले यांनी आपल्या संबोधनातून मोदी सरकारच्या शेती विषयक धोरणावर कडाडून हल्ला केला. मोर्चातील उपस्थिती बाबत बोलतांना आम्ही प्रकाश पोहरे यांचे नेतृत्वात कालच माहूर तालुक्यात 27 ठिकाणी शाखा उघडल्याचे सांगून किमान त्या शाखेच्या कार्यकर्त्यांनी तरी मोर्च्यांत सहभाग घेणे गरजेचे होते अशी खंत व्यक्त केली.सभेचे प्रास्ताविक अविनाश टनमने यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.प्रवीण बिराजदार व आभार प्रदर्शन नंदू संतान यांनी केले.मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सुनिल वानखेडे, नरेंद्र टनमने,प्रवीण मार्कड, सुभाष लकडे, आगाखान पठाण, संतोष राऊत, जगदीश अडकिने, प्रविण महल्ले, प्रविण गावंडे, ओमकांर कुटे, बालाजी टनमने, राजेंद्र गावंडे, विष्णु खराटे, संदीप आडावे, रवी कासोळकर,विलास राठोड, जियाखान फारुकी, भावराव पेंदोर, रितेश डुबे, सुनिल शिंदे, प्रविण पोटेकर, वैभव लाड, बाबराव राऊत, दिपक जाधव, सय्यद पाशा, दत्ता महाराज निलेवाड, सुनिल जगताप, विट्ठलराव अडकिने आदिंनी प्रयत्न केले.यावेळी पो.नि.लक्ष्मण राख यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.भालचंद्र तिडके,अण्णासाहेब पवार,पोलीस उप निरीक्षक शरद घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.