Home जळगाव दिल्ली किसान आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली

दिल्ली किसान आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली

145

रावेर (शरीफ शेख)
दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये जे शेतकरी शहीद झाले अशा अडतीस शेतकऱ्यांना आज जळगाव येथील काव्यरत्नावली चौकात विविध संघटना व संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा ताई शिंदे यांनी शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचे जीवन प्रत्यक्ष दिल्ली येथे जाऊन बघितले असल्याने त्यांनी त्यांचे सविस्तर वर्णन सादर केले व शेतकरी आपल्या स्वार्थासाठी नव्हे तर या संपूर्ण भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आपले जीव बलिदान करीत आहे अशा या थोर शेतकरी बांधवांना आम्ही जळगाव तर्फे श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे प्रास्ताविकात सादर केले

*यावेळी खालील घोषणा देण्यात आल्या*

अमर रहे- अमर रहे किसान अमर रहे,
हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा
जय जवान जय किसान
केंद्र सरकार चा धिक्कार असो
शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा मान्य करा

*यांची होती उपस्थिती*

ईकरा एज्युकेशनचे करिम सालार, लोक संघर्षाचे सचिन धांडे, आंबेडकर वादी समितीचे हरिश्चंद्र सोनवणे व मुकुंद सपकाळे, मन्यार बिरादरीचे फारूक शेख, एमपीजे चे मुस्ताक शेख व आरिफ देशमुख ,अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद ,नियाज अली फाऊंडेशनचे अयाज अली सय्यद, प्राध्यापक प्रीती लाल पवार, एडवोकेट प्रवीण पाटील, दर्शना पवार सलोनी शिंदे रोहिणी धनगर,सुंदर पत्रकार कामिल शेख, फहिम पटेल, शरीफ पटेल,सलीम मिस्‍तरी, रमेश सोनवणे, मतीन बेलोरकर जाहिद शेख व अनिस शाह आदींची उपस्थिती होती.