Home विदर्भ स्लग-वाळू भरला ट्रॅंकर अंगावर चढवून वनरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न

स्लग-वाळू भरला ट्रॅंकर अंगावर चढवून वनरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न

55
0

इकबाल शेख

वनरक्षक गंभीर जखमी, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा जिल्ह्यातील कापसी परीसरात रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने गस्तीवर असलेल्या वनरक्षकाच्या अंगावर ट्रॅक्टर चालविण्याने या घटनेत वनरक्षक जाकीर शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 कापसी परीसरात रात्री वनरक्षक जाकीर शेख व वनरक्षक सज्जनकुमार हे दोद्ये गस्तीवर असताना त्यांना वाळू भरला ट्रॅक्टर जातांना दिसला यावेळी वनरक्षकांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर वनरक्षकांच्या अंगावर चढविला यामध्ये वनरक्षक जाकीर शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला.या संबंधी वनविभागाच्या वतीने अल्लिपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.