Home नांदेड मौ.राऊतखेडा ता.कंधार येथील अपूर्ण काम केलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या कामाची चौकशी करावी – ...

मौ.राऊतखेडा ता.कंधार येथील अपूर्ण काम केलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या कामाची चौकशी करावी –  प्रशांत बारादे ( राऊतखेडकर

37
0

नांदेड –  मौ.राऊतखेडा ता.कंधार येथील आरोग्य उपकेंद्राची मोठी दयनीय दुरावस्था झाली असुन आरोग्य उपकेंद्र असुन नसल्यात जमा आहे .मागील एका वर्षात दुरुस्तीच्या नावाखाली रुग्णालय बंद अवस्थेत आहे .जे काम केले आहे ते बोगस करण्यात आले आहे .मागील एका वर्षापासुन अपूर्ण असलेल्या या बोगस कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पञकार संरक्षण समिती नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे – राऊतखेडकर यांनी केली आहे .

कोरोनाकाळात नागरिकांना गावपातळीवर आरोग्यसेवा मिळावी म्हणून राऊतखेडा आरोग्य उपकेंद्राला एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली पण येथील रूग्णालयाच्या झालेल्या दुरवस्थाकडे कोणी लक्ष दिले नाही .गतवर्षी जिल्हा परिषदेकडून आरोग्य उपकेंद्र रूग्णालय दुरूस्तीसाठी व रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध झाला पण संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी जुन्या व तुच्छ प्रकारच्या खिडक्या ,दरवाजे व गेट बसवुन तथा थातूरमातूर व अर्धवट अपूर्ण काम करुन पूर्ण बिल उचलून आलेला निधी हडप करून फरार झालेले आहेत आजही आरोग्य उपकेंद्राचे कामे कामे प्रलंबित असल्याने आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा परिस्थिती निर्माण झाली आहे तथा आरोग्य उपकेंद्राचा परीसर हा जुगारी तथा तळीरामासाठी एक मुख्य प्रेक्षणीय केंद्रच बनले आहे .तरी पञकार संरक्षण समिती नांदेड प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे राऊतखेडकर यांनी मौ.राऊतखेडा ता.कंधार येथील आरोग्य उपकेंद्राच्या कामाची चौकशी करावी संबंधित अधिकारी व गुत्तेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेब नांदेड ,आमदार श्यामसुंदर शिंदे लोहा कंधार विधानसभा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कंधार यांच्याकडे केली आहे.निवेदनावर प्रशांत बारादे राऊतखेडकर व सुमित बारादे यांची स्वाक्षरी आहे .