Home विदर्भ पहिल्या टप्प्यात 17 हजार आरोग्य कर्मचा-यांना देणार कोरोनाची लस – विवेक भीमनवार

पहिल्या टप्प्यात 17 हजार आरोग्य कर्मचा-यांना देणार कोरोनाची लस – विवेक भीमनवार

146

योगेश कांबळे

वर्धा,दि 11 :-  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लस उपलब्ध झाल्यानंतर राज्यात कोविड -19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 17 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येईल. यासाठी आरोग्य विभागाने पूर्व तयारी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिल्यात.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्कफोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, शिक्षणाधिकारी संजय मेहर, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी संजय केवदे मेडिकोज लॉयन्सचे संचालक डॉ. पी.आर. धाकटे, रोटरी क्लबचे अमित गांधी व समाज कल्याण विभागाचे राजेंद्र आढाऊ उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात कोविड -19 ची लस उपलब्ध होताच आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, यामध्ये वैद्यकिय अधिकारी, आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस यांचा समावेश असणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ग्रामिण भागासाठी 4 हजार 795 , शहरी 2 हजार 689 व खाजगी वैद्यकिय व्यावसायिक 10 हजार 332 अशा 17 हजार 816 लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. लस साठवणूक , लस देण्याकरीता आवश्यक मनुष्यबळ यांचे नियोजन करण्यात आलेले असल्याचे डॉ अजय डवले यांनी सांगितले.
0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोज
त्याचबरोबर 17 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी यांनी केले.
17 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून जिल्हयातील 0 ते 5 वष वयोगटातील ग्रामीण 79 हजार 200 व शहरी भागातील 30 हजार 130 अशा 1 लाख 9 हजार 331 बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागात 1 हजार 139 बुथ व शहरी भागात 202 बुथवरुन बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. भटक्या लोंकाचे पाडे, उस तोडणारे मजुर, बांधकामावरील मजुर, विटभट्टी वरील मजुरांच्या बालकांना लसीकरण करण्यासाठी 93 मोबाईल पथक तसेच बस स्टेशन, रेल्वे स्टेशन व टोल नाके येथे 84 ट्रांझिट पथक कार्यरत असणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांनी केले आहे.