Home विदर्भ सत्तर वर्ष वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार

सत्तर वर्ष वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार

39
0

आष्टी (शहीद):- रवींद्र साखरे

वर्धा –  आष्टी येथील स्थानिक वार्ड क्रमांक 6 मधील इमलीपुरा येथील राहणारा शब्बीर शहा मेहमूद शहा वय 70 वर्ष याने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला अशी तक्रार पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 10/12/2020रोजी दाखल करण्यात आली.
सदर माहिती या प्रमाणे की आरोपी शब्बीर शहा मेहमूद शहा याने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अंदाजे दहा ते बारा दिवसापूर्वी अत्याचार केला होता असे पीडित अल्पवयीन मुलीने भीती पोटी आज दिनांक 10/12/2020 रोजी आई वडिलांना सांगितला असता पीडितेच्या वडिलांनी तात्काळ आष्टी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून सदर आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 182 कलम 376AB, 323, 506, पॉक्सो 2012 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार जितेंद्र चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने, NPC स्वप्नील वाटकर, PC सूरज मेंढे करत आहे.