Home विदर्भ उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या दलालाची अरेरावी सुरुच

उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या दलालाची अरेरावी सुरुच

65
0

यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचा हस्तक तो दलाल कोण ?

यवतमाळ दि. १० डिसेंबर  – यवतमाळ येथील उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयातील दलालांचा सततचा वावर व कार्यलयाचा भोंगळ कारभाराची पाहणी केली.या वेळी अनेक जण अनुपस्थित आढळुन आल्याने जिल्हाधिकारी यांनी संताप व्यक्त केला.उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयातुन शेतकऱ्याची,सर्व सामान्यांची अनेक कामे केली जातात त्यामध्ये शेत मोजणी,नकाशे,घर मिळकतीची मोजणी,भुसंपादन,विवीध उतारे याच कार्यालयातुनच होत असल्याने यवतमाळ येथील उपअधीक्षक भूमिवअभिलेख कार्यालयात नेहमी चर्चेचा विषय ठरला असून याठिकाणी नेहमीच दलालांचा सुळसुळाट असतो.या ठिकाणी दलालामार्फत कमी वेळात आवश्यक असलेले फेरफार,नकाशे इत्यादी कागदपत्रे काढून देण्यासाठी देण्यात येते.उप अधिक्षक कार्यालयाचा कारभार पाहता जिल्हाधिकारी यांनी अकस्मात भेट दिली होती.यामुळे या कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला होता.मात्र या परिसरात आजही दलालांचा सुळसुळाट कमी होताना दिसत नाही. यातच दलालांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तकांचाही न होणारी कामे याच दलालांच्या माध्यमातून केल्या जात असल्याचे बोलल्या जाते. यामध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षांचा राईट हँड चांगलाच दबदबा असल्याने तो दलाल त्याच परिसरात मिरवत असतो. या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला कोणते काम आहे. आत्ताच करून देतो असे सांगून शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची सर्रास लुट करतो.विशेष म्हणजे दिड फुट्या या नावाने प्रसिद्ध असलेल्या दलालांने शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हस्ते भुमिअभिलेख उपअधीक्षक राठोड यांचा काही विशेष कारण नसताना सत्कार करून कोरोना काळात चांगले कार्य केल्याच्या खोट्या बातम्या प्रकाशित करून श्रेय सुद्धा लाटले.तसेच त्याच कार्यालयातील राऊत मॅडम यांचाही सत्कार करून त्यांच्यावर एक प्रकारे वचक निर्माण करण्याचा प्रयत्न शहर काँग्रेस कमिटीच्या पदावर असल्याच्या नावावर तो दुरुपयोग करून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील आपली कामे करुन घेत त्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांवर दबावही टाकत असल्याचे बोलल्या जात आहे. या दलांलामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत असुन या शहर काँग्रेस कमिटीच्या भुमिअभिलेख कार्यालयात मिरवणाऱ्या देडफुट्या दलालांवर पक्ष श्रेष्ठी काही कारवाई करतील का ? याकडे लक्ष लागलेले आहे.