Home मराठवाडा ध्यानयोग मानवाला निरोगी आणि बलवान बनवते- योगीराज कैलासनाथ

ध्यानयोग मानवाला निरोगी आणि बलवान बनवते- योगीराज कैलासनाथ

59
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना –  सामाजिक सुधारणा, धार्मिक कार्यासोबतच
आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि ध्यान योग केंद्राच्या माध्यमातून समाजातील वैफल्यग्रस्त, मानसिक संतुलन ढासळलेल्या, शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करत त्यांना निरोगी,भयमुक्त जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्नशील असलेले मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील संजिवन समाधी ध्यान केंद्राचे अध्यक्ष योगीराज कैलासनाथ महाराज यांनी सांगितले कि,’ध्यानयोग मानवाला निरोगी आणि बलवान बनवते.’
– जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे योगिराज कैलास नाथ महाराज यांचा आश्रम आहे.दैनिक ‘ महाभारत ‘ शी बोलताना त्यांनी माहिती दिली .ते पुढे म्हणाले की, आश्रमात मोफत ध्यानयोग शिबिर घेतले जातात.येथे येणाऱ्या दुःखी, पिडीतांना योग्य मार्गदर्शन करत त्यांचे मानसिक समाधान केले जाते.धार्मिक, अध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येतात.शारिरीक पिडा असणाऱ्यांना त्यांच्यावर अचूक असे आयुर्वेदीक औषधोपचार केले जातात, आणि हे सर्व करत असताना कुठेही अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही.याबाबतची खबरदारी घेतली जाते.मागील वीस वर्षांत हजारों दुःखी,पिडितांचे अश्रृ पुसण्याचे महत कार्य येथे झालेले आहे.या संदर्भात कैलासनाथ महाराज यांच्या सान्निध्यात असलेले गोपाळ चव्हाण यांनी सांगितले की, महाराजांच्या अथक परिश्रमाने मच्छिंद्रनाथ चिंचोली गावाला वैभव प्राप्त झाले आहे.महाराजांनी धार्मिक कार्यांबरोबरच सामाजिक कार्याची धुरा सांभाळली आहे.कोरोना महामारिच्या काळात गरजू लोकांना, वारकऱ्यांना मोफत अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप केले.आश्रमात येणाऱ्या लोकांसाठी कायम अन्नछत्र उभारले आहे.गोरगरिबांच्या मुलींच्या लग्न कार्यात आर्थिक मदत करत आहेत.असहाय्य वारकरी, साधुसंतांचा आदर करत त्यांना भरपेट भोजन देत दक्षणा देण्याची व्यवस्था केली जाते.शेतीव्यवसाय, आश्रमव्यवस्था औषधी केंद्र आणि आता जिनिंग आणि प्रेसिंगच्या माध्यमातून शेकड़ो बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.