Home मुंबई शेतकरी विधेयक, डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आरपीआय डेमोक्रॅटिकचा आझाद...

शेतकरी विधेयक, डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आरपीआय डेमोक्रॅटिकचा आझाद मैदानावर मोर्चा

112

मुंबई-१०-(प्रतिनिधी )-केंद्र सरकारचे शेतकरी विधेयक रद्द करा. डॉ. आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करा, मतपत्रिकेवर मतदान, भारतीय संविधानचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, कोळीवड्याच्या मालकीहक्क यासह विविध मागण्यांसाठी आरपीआय डेमोक्रॅटीक या पक्षाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर पक्षनेते कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. 

दादर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम जलद गतीने सुरु करण्यात यावे, आगामी निवडणूक एव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे केंद्राद्वारे संमत करण्यात आलेले जाचक शेतकरी विधेयक त्वरित रद्द करावे,

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा संविधानाचा शालेय माध्यमिक अभयसक्रमात समावेश करण्यात यावा. अंधेरी एमआयडीसी एसआरए प्रकल्पातील भ्रष्ट्राचारासाठी समिती नियुक्त करावी,

आरे वसाहतीतील झोपडीवासीयांना वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, कोळीवाड्यांना जमिनीवर मालकीहक्क मिळावा, नवी मुंबइ विमानतळावर वाघिवळीवाडा लेणीचे पुनर्वसन करावे, गावांना पुनर्वसन करून गावकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा.

या व अन्य मागण्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्या.

राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व कार्याध्यक्ष कॅ. श्रावण गायकवाड आयोजित मोर्चा मध्ये उपाध्यक्ष वसंत कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ कांबळे, या प्रमुख पदाधिकऱ्यासह महिला व शेकडो कार्यकर्ते उपस्तिथ होते,

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे, वसंत कांबळे, हरिभाऊ कांबळे, यांनी आपापली मत व्यक्त केली व केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला व मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कनिष्क कांबळे यांनी दिला.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रावण गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय चव्हाण प्रभू बनसोडे, आकाश रावते, प्रकाश रणदिवे, इम्रान खान यांनी अथक परिश्रम घेतले.