Home पर्यावरण तारा आदिवासी सामाजिक संस्था च्या सहकार्याने व तरुणाच्या पुढाकाराने बांधला वनराई बंधारा…

तारा आदिवासी सामाजिक संस्था च्या सहकार्याने व तरुणाच्या पुढाकाराने बांधला वनराई बंधारा…

302

दिनेश आंबेकर – जव्हार

पालघर , दि. 4 डिसेंबर जव्हार तालुक्यातील तिलोंडा ग्रामपंचायत मधील बांबरेपाडा रांजना ओहळ येथे तारा आदिवासी सामाजिक संस्था व तरुणांच्या आणि विद्यार्थीच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे…

ग्रामीण भाग हा डोंगर उतारावर असून पडणारे पावसाचे पाणी हे वाहून जात असते परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते यावर मात करण्यासाठी व पडणारे पाणी हे वनराई बंधारा बांधून अडवून ते पाणी माणसांच्या वापरात यावे शेती साठी वापर व्हावा व जनावरांना पिण्यासाठी वापर व्हावा व पाण्यासाठी होणारी पायपीट कुठे तरी कमी व्हावी या उद्धेशाने तारा आदिवासी सामाजिक संस्था व प्रशांत कामडी, कैलास भोये, सुरज गांगोडा, पंकज चौधरी, आनंद भोये, भावेश साठे, हेमंत हिरकुडा, कल्पेश साठे, शिवम साठे, राहुल साठे, हरेश भोये व इतर तरुणाच्या व विद्यार्थी च्या सहकार्याने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे त्याचा उपयोग हा माणसाच्या पिण्या साठी वापरासाठी शेतीसाठी भाजीपाला लागवडी साठी त्याच बरोबर जनावरांन पिण्या साठी होऊन पर्यावरणाच्या हितासाठी होणार आहे…

प्रदीप कामडी
संस्थापक तारा आदिवासी सामाजिक संस्था :-
” उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी छोट्या मोठ्या बंधाऱ्यासह वनराई बंधारे उपयुक्त ठरतील.”