Home बुलडाणा साखरखेर्डा पोलिसांची ए टी एस च्या मदतीने मोठी कार्यवाही

साखरखेर्डा पोलिसांची ए टी एस च्या मदतीने मोठी कार्यवाही

61
0

 

दोन पिसतूल जिवंत कार्तृस सह अरोपीस अटक ,

 

बुलडाणा ,

साखरखैर्डा बसस्थानकावर साखरखेर्डा पोलीसांनी ए टी एस च्या मदतीने स्थानिक एका आरोपीस कुरियर च्या माध्यमातून आलेल्या दोन पिस्तुल व तीन जिवंत कार्तृस सह अटक केली आहे . उपरोक्त घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे .
साखरखेर्डा बसस्थानकावर एका कुरीयर वाल्याकडून एक पार्सल घेऊन जात असतांना साखरखेर्डा येथील गोपाल रामसिंग शिराळे या युवकाला ए टी एस पथकाने साखरखेर्डा पोलीसांच्या मदतीने पकडले . आज दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली . , अगोदरच पोलीसांनी सापळा रचला असल्याने त्याला पकडले . साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये त्याला आणले असता शासकीय कर्मचारी पंचासमक्ष कुरियरने आलेला बाॅक्स उघडला असता , त्यामध्ये दोन पिस्तूल सह जिवंत कार्तृस आढळून आले . आजच्या या मोठ्या कारवाई मुळे साखरखेर्ड्यासह संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . हा कुरियर पार्सल कुठून आला ? यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का ? या दिशेने तपास सुरू असून बातमी लिहोस्रतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेचा तपास साखरखेर्डा थानेदार जितेंद्र आडोळे हे करीत आहे ,