बुलडाणा

दरोड्यासारख्या गंभीर गुन्हयांचा कट उधळून केले 7 आरोपीं  अटक,1 फरार !

 

अमीन शाह ,

बुलडाणा:- दरोडया सारख्या गंभीर गुन्ह्याचा कट उधळून लावीत सुलतानपुर ते मेहकर रोडवरील सुलतानपुर नदीपुला जवळून 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून टाटा सफारी 5 मोबाईल फोन , दोन लोखंडी रॉड , एक लोखंडी पाईप , मिरची पावडर , दोन देशी दारूंच्या बॉटल , पिवळ्या धातुचा गिन्या ( नकली सोने ) एकुण नग  405 वजन अंदाजे 630 ग्राम सह त्यांच्या ताब्यातील वाहन टाटा सफारी असा एकुण 1 लाख 9 हजार 320
रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही क कामगिरी मेहकर पोलिसांनी शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी केली आहे.विशेष म्हणजे घटनास्थळांवरून 3 आरोपी पडून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत दोघांना अटक केले आहे.तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.या 7 आरोपींविरुद्ध कलम 399,402 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील पोलीस निरिक्षक प्रधान यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

 

-भर रस्त्यात लुटण्याचा रचला होता कट-

शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी सुलतानपुर ते मेहकर रोडवरील सुलतानपुर नदीपुला जवळ दुपारी टाटा सफारी गाडी क्रमांक MH 14 BC 991 ही वाहन उभी असुन गाडीमध्ये ८ व्यक्ती आहेत व त्याच्या जवळ लोखंडी हत्यार असुन ते कोणाला तरी लुटण्याच्या तयारीने वाट पाहत ऊभे असल्याची खात्री लायक माहीती मेहकर पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या
मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रभाकर सानप , पोकॉ निवृत्ती सानप , गणेश लोढे , राजेश उंबरकर , विजय आंधळे यांणी पोलासवाहणासह दोन पंचा ना सोबत घेवुन घटनास्थळ असलेल्या ठिकाणी गेले असता सुलतानपुर नदीपुला वर एक टाटा सफारी क्र. MH 14 BC 991 ही उभी असलेली दिसली दरम्यान वाहन पोलीसांनी तपासले असता त्या वाहनात 8 जण व 5 मोबाईल फोन , दोन लोखंडी रॉड , एक लोखंडी पाईप , मिरची पावडर , दोन देशी दारूंच्या बॉटल , पिवळ्या धातुचा गिन्या ( नकली सोने ) एकुण नग  405 वजन अंदाजे 630 ग्राम सह त्यांच्या ताब्यातील वाहन टाटा सफारी असा एकुण 1 लाख 9 हजार 320 रूपये चा मुद्देमाल आढळून यावेळी वाहनामधील 3 आरोपींनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी त्यांचा पाठलाग करूण 2 आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले तर एक आरोपी फरार झाला.पकडण्यात आलेले आरोपीचे नाव 1 ) बळीराम पुंडलीक चव्हाण वय 55 वर्ष रा. धदम ता. खांमगांव 2 ) रविद्र प्रभु भोसले वय 28 वर्ष रा .ध दम ता. खांमगांव, 3 ) राष्ट्रपाल देवानंद जाधव वय 26 रा. धदम ता. खांमगांव 4) अकाश मानिकराव चव्हाण वय 18 5 ) दिलीप ज्ञानेश्वर चव्हाण वय 22 वर्ष रा.लाखणवाडा ता. खांमगाव 6 ) सतिष मोहन पवार वय 19 रा. जयरामगड ता. खांमगाव 7 )करविंद भिका चव्हाण वय 14 वर्ष रा . धदम ता. खामगांव असे आहे.तर पळुण गेलेल्या आरोपीचे नाव गणेश राठोड असे असुन तो लाखणवाडानता. खामगांव येथील आहे.दरम्यान पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस स्टेशनमध्ये कलम 399,402भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752