परभणी

त्या कुटुंबास चार लाखाच्या मदतीचा धनादेश तहसीलदारांनी दिला , सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केला होता पाठपुरावा

परभणी – अवकाळी पावसात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या एका शाळकरी मुलाच्या कुटुंबास शासकीय मदतीचा धनादेश बुधवारी सोनपेठ तहसिलदारांनी दिला. यासंदर्भात धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष, परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

वीस दिवसापूर्वी परभणी लोकसभा मतदारसंघातील कानेगाव तालुका सोनपेठ येथील लक्ष्मण गोविंद दुगाने या दहा वर्षीय बालकाचा अवकाळी पावसात वीज अंगावर पडून जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेचा पंचनामा झाल्यानंतर या कुटुंबास मदत मिळण्याची मागणी शासनस्तरावर करण्यात आली होती. या मागणीचा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष,परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी परभणी जिल्हाधिकारी, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान, विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यास शेवटी यश आले. काल बुधवारी तहसीलदार बिराजदार यांच्या हस्ते मयत लक्ष्मण चे वडील गोविंद दुगाणे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सोपविण्यात आला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्पर कार्यवाही केल्याने तहसीलदार बिराजदार साहेब यांची अभिनंदन होत आहे.

Tags

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752