Home विदर्भ “कोरपणा नगर पंचायतीत एक हाती सत्ता द्या” , आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे...

“कोरपणा नगर पंचायतीत एक हाती सत्ता द्या” , आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

49
0

भारत चन्ने सह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

कोरपना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला एकहाती सत्ता द्या असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांना केले ते कोरपना तालुका तथा शहर काँग्रेस कडून आयोजीत केलेल्या कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरपणा कृषी उत्पन बाजार समीतीचे सभापती श्रीधर गोडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजुरा नगरीचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे सी डी सी सी बँक संचालक विजयरावजी बावणे,प्रभारी नगराध्यक्ष श्री.सुनील देशपांडे तालुक अध्यक्ष विठ्ठल थिपे उत्तम पेचे श्याम रणदिवे स.गां.निराधार समीती अध्यक्ष साईनाथ बत्तकमवार उमेश राजुरकर कांता भगत गडचांदुर न.प.गटनेते श्री विक्रम येरणे राहुल उमरे अरविंद मेश्राम दिनकर मालेकर सीताराम कोडापे शैलेश लोखंडे मिलिंद ताकसांडे मनोहर चन्ने आदी उपस्थित होते .
संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष पदावर निवड झालेल्या कोरपना तालुक्यातील उमेश राजूरकर व राजुरा तालुक्यातील साईनाथ बतकमवार यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच काँग्रेसचे जेष्ठ नेते भाऊराव कारेकर तसेच भारत चन्ने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सत्कार करण्यात आला.
पुढे आमदार धोटे म्हणाले की कोरपना तालुका व शहरासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही कोरोनाच्या भयानक परिस्थितीत सुद्धा कोरपना शहरासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून समोरही निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले .
अध्यक्षीय भाषणात श्रीधर गोडे यांनी आम्ही सर्व विजय बावणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू व कोरपना नगरपंचायतवर कॉंग्रेसचाच झेंडा फडकवू असा विश्वास आमदार सुभाष धोटे यांना दिला.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत लोडे प्रास्ताविक विजय बावणे तर आभार नितीण बावणे यांनी मानले यावेळी बहुसंख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.