नांदेड

गरोदर महीलेला मारहाण केल्या प्रकरणी माहूर पोलीसात दोघावर गुन्हा दाखल.

मजहर शेख, नांदेड

नांदेड/ माहूर , दि. १९ – माहूर येथील तिन महीन्याची गरोदर महीला अर्चना योगेश साबळे (28 ) हिने दि.17 नोव्हें.रोजी दिलेल्या फिर्यादी वरून व जबानी वरून माहूर पोलीसांनी गणेश साबळे व योगेश साबळे या दोघा विरुध्द कलम 323,504,506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अर्चना साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत वरील दोघांनी तिला लाथा-बुक्क्यानी मारहाण केल्याने व तिच्या नातेवाईकांना तुम्ही आमच्या घरी का आले ?यायचे नाही असे धमकवल्यामुळे वरील दोघावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांचे मार्गदर्शनात पुढील जे.जी.मेश्राम हे करीत आहेत.
अर्चना हीस मारहाण झाल्या नंतर तिच्या भावाने व अन्य नातेवायीकाने तिला लागलीच ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.त्यानंतर सुमारे चार तासाने गणेश साबळे व योगेश साबळे हे ग्रामीण रूग्णालयात गेले असता रुग्ण कक्षेतच त्यांनी रुग्णासह नातेवाईकांशी झटापट व मारहाण केल्याने एका महीलेचा चिरकण्याचा आवाज आला.मात्र त्यासंदर्भात अद्याप कुणावरही गुन्हा झाला नाही.
अर्चना साबळे या गरोदर महीलेस बी.पी.कमी झाल्यामुळे चक्कर आल्याने दु.2 वाजता दाखल केले.तपासणी केली असता तिच्या गालावर मार आढळून आला.त्यासंदर्भात लागलीच पोलीसांना कळविले.रुग्ण कक्षेत झालेल्या प्रकाराची माहितीही तात्काळ पोलीसांना देण्यात आली.घडलेल्या घटने बाबत रूग्णालयाचे वतीने कुठलीही लेखी तक्रार पोलीसांना दिली नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी.मोरे यांनी दिली.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752