जळगाव

आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते मुक्ताईनगर मतदार संघ(रावेर विभागात) शेत रस्ते पाणंद योजनेअंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन

छोटू पाटील माजी सरपंच रेभोंटा यांची लोकाभिमुख कामगिरी कौतुकास्पद – आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही.

रावेर (शरीफ शेख)

रावेर मुक्ताईनगर मतदारसंघातील विकासाचा ध्यास असलेले कार्यतत्पर म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय आमदार मा श्री.चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगर मतदार संघात (रावेर विभाग)येत असलेल्या मतदारसंघातील ४४ गावे असून त्यात विटवा,निंबोल, ऐनपुर,कोळदा, धमोडी,रेम्भोटा,खिर्डी बुद्रुक रेंभोटा, पुरी,उदळी,तासखेडा,रणगाव,गहुखेडा, रायपूर,सुतगाव, थोरगव्हाण,गाते,

या गावांमध्ये लेखाशीर्ष पाणंद शेतीरस्ते योजना अंतर्गत शेतीरस्ते खडीकरण व भूमिपूजन करण्यात आले.त्याचप्रमाणे मतदार संघात अजून काही निधी उपलब्ध करून विकासकामाचा जोरदार धडाका कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरू केला आहे तसेच दै.पुण्यप्रताप च्या प्रतिनिधी शी संवाद साधताना आ.पाटील यांनी आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत ज्याप्रमाणे तुमच्या शेतरस्ते.असतील पाण्याचा,लाईट प्रश्न असेल तो आधी प्राधान्याने सोडवला जाईल व त्यामाध्यमातून केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे , तसेच खिर्डी येथे शव पेटी व स्वर्ग रथ लवकरच उपलब्ध करून देणार आहे.असा शब्द ही दिला.
याप्रसंगी येथील भागवत पाटील,युवराज महाजन-माजी सरपंच रेम्भोटा,जेष्ठ शिवसैनिक भास्कर पाटील,जयंत पाटील,भागवत कोळी,मोहन कोळी,सुनील महाजन,अमोल पाटील,साबीर बेग,बेवन पिंजारी खिर्डी, भागवत महाजन,योगेश चौधरी, अनिल महाजन,दीपक महाजन,दिलीप गाढे,सोहम सपकाळे. शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिनेश गंभीर पाटील उर्फ छोटू भाऊ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752