Home बुलडाणा सामाजीक बांधीलकी जपत”आईला पोरक्या झालेल्या लेकराला ” आर्थिक मदत करून दीपकभाऊ देशमाने...

सामाजीक बांधीलकी जपत”आईला पोरक्या झालेल्या लेकराला ” आर्थिक मदत करून दीपकभाऊ देशमाने यांचा देऊळगाव माळी मध्ये वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

327

देऊळगाव माळी –  कैलास राऊत 

बुलठाणा , दि. 3/11/20 अतिशय अल्प कालावधीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात नावारूपाला आलेली मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपकभाऊ देशमाने यांचा आज देऊळगाव माळी शाखेत सामाजिक उपक्रम राबवून स्थानिक स्व.सपना विलास गवई यांच्या मृत्यूमुळे पोरक्या झालेल्या त्यांच्या लेकरांना पाच हजाराची आर्थिक मदत देऊन देऊळगाव माळी येथील शाखा व्यवस्थापक, कर्मचारी व सल्लागार मंडळ यांनी वाढदिवस साजरा केला, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ देशमाने हे होते तर तर देऊळगाव माळी शाखेचे संचालक बाबूराव मगर पाटील अध्यक्षस्थानी होते त्याचबरोबर, प्रमुख उपस्थिती मध्ये शेषराव बापू सुरूशे, संतोष सावळकर सर, नारायण बळी साहेब, बी.के. सुरूशे , राजेश बळीराम मगर, इंगोले मामा, एम व्ही गाभणे सर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाऊ डोंगरे विलास गवई ,जागृती महिला शाखेचे ब्रँच मॅनेजर वानरे साहेब चिखली, देऊळगाव माळी शाखेची ब्रांच मॅनेजर नितीन बळी साहेब, संजय देशमाने, मान्यवर इत्यादी उपस्थित होते सुरुवातीला विलास गवई यांच्याकडे वरील मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली त्यानंतर बँकेच्या स्थानिक संचालकांनी दीपक भाऊ देशमाने यांचा भव्य सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार कैलास राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक शाखेचे कॅशियर संतोष मगर ,कर्मचारी पवन गाभणे, अल्पबचत प्रतिनिधी जयराम बकाल इत्यादींनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ब्रांच मॅनेजर नितीन बळी यांनी केले.